Rajasthan Horror: कुटुंबातील पुरुषांसह नातेवाईकांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर जबरदस्ती; पतीची विकृत मानिसकता
Stop Rape (Representative image)

Crime News In Rajasthan: राजस्थान (Rajasthan) राज्यातील चुरु येथील एका विवाहीत महिलेसोब मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. महिलेने दिलेली पोलीस तक्रार आणि आरोपांमध्ये म्हटले आहे की, पीडित महिलेस तिचा पती कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांसोबत शारीरिक संबंध (Physical Relations With Relatives) ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असे. पतीच्या विकृत मानसिकतेमुळे पीडितेला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनेची तातडीने नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. तसेच, पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हाही दाखल केला आहे. संशयीत आरोपींमध्ये पीडितेचा पती, दीर, सासरा, मेहुणा आणि इतर नातेवाईकांचाही समावेश आहे.

15-20 वर्षांपासून  अत्याचार

एनडीटीव्ही राजस्थानच्या वृत्तानुसार, पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ज्यामध्ये पीडितेचे सासरे आणि मेहुणे यांच्यासह आठ जणांवर बलात्कार प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. सांडवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने आरोप केला आहे की, तिचा पती गेल्या 15-20 वर्षांपासून तिला अंमली पदार्थ पाजत आहे आणि इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत आहे. तिचा दावा आहे की, पीडिता जेव्हा पतीच्या कृती आणि आग्रहास नकार देत असेल तेव्हा तो तिला मारहाण करुन शारीरिक हिंसा करत असे. अनेकदा तो तिला चहा किंवा तत्सम पेयांमधून अंमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडत असे. (हेही वाचा, Wife Burns Husband Private Parts With Cigarette: धक्कादायक! पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टला दिले सिगारेटने चटके; आरोपी पत्नीला अटक)

धारधार शस्त्राने गळा चिरण्याचा प्रयत्न

महिलेने आरोप केला आहे की तिचा नवरा तिच्या चहामध्ये नशिले पदार्थ मिसळतो. त्यामुळे तिचे भान हरपते आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला जातो. एका घटनेबाबत अनुभवकथन करताना पीडितेने सांगितले की, एकदा पीडितेने जेव्हा पतीच्या कृतीस विरोध केला तेव्हा पतीने धारधार शस्त्राने तिचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. तीन मुले आणि एका मुलीची आई असलेल्या महिलेने एफआयआरमध्ये असेही नमूद केले आहे की, आरोपींनी तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ज्याच्यासोबत तिची मुले सध्या राहत आहेत. शनिवारी, 4 मे रोजी ही घटना उघडकीस आली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. (हेही वाचा, Man Kills Wife for Medical Bills: वैद्यकीय खर्च भरण्यात अपयश, पतीने रुग्णालयातच घोटला पत्नीचा गळा)

पेयामध्ये गुंगीचे औषध टाकून अत्याचार

दरम्यान, राजस्तानातील येथे 28 एप्रिल रोजी अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली. ज्यामध्ये बिकानेर आणि जेसलमेर दरम्यान चालत्या स्लीपर बसमध्ये 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. हा गुन्हा चुरू जिल्ह्यातील रतननगर भागात घडला. धाधरिया बनिरोतन गावात राहणारा 21 वर्षीय आरोपी अनिल मेघवाल याने दीड वर्षांपूर्वी धाधरिया गावातील धर्मशाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या कृत्यादरम्यान त्याने तिच्या ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकले आणि अश्लील छायाचित्रे काढली, ज्याचा नंतर तो तिला ब्लॅकमेल करत असे. 28 एप्रिल रोजी मेघवालने अल्पवयीन मुलीला दुकानात जाताना अडवले आणि तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तिचे अपहरण केले. त्यानंतर सरदारशहर ते जैसलमेरला जाणाऱ्या स्लीपर बसमध्ये त्याने अल्पवयीन मुलीला नेले आणि चालत्या बसमध्ये तिच्यावर दोनदा बलात्कार केला.