सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फोटो काढून टाकण्याचे राजस्थान सरकारचे आदेश
Veer Savarkar (Photo Credit: Twitter)

राजस्थान सरकारने राज्यातील सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) आणि पंडित दीनदयाल उपाध्याय (Deendayal Upadhyaya)  यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत अशोक गहलोत यांच्या सरकारने सावरकर यांचे फोटो काढण्याचा आदेश देणारे एक पत्रक शाळांसाठी जाहिर केले आहे. एवढेच नाही तर आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. याच कारणास्तव आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.राजस्थान सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो शाळांमधून काढून टाकण्याच्या निर्णयाचा भाजप पक्षाकडून निषेध करण्यात आला आहे.

शाळेतून स्वातंत्र्यवीर सावकर आणि उपाध्याय यांचे फोटो काढून देणार नाही भाजप कडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर राजस्थान माजी शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांच्याकडून राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. त्यांनी टीका करत असे म्हटले आहे की, काँग्रेस सरकारला फक्त एकाच कुटुंबातील व्यक्तींचे फोटो पाहू इच्छितात. परंतु भाजप हे कधीच सहन करणार नाही असे ही देवनानी यांनी म्हटले आहे. (शिवाजी महाराजांचा पुतळा छिंदवाडा येथे पुन्हा सन्मानाने बसवणार; मध्य प्रदेश सरकारने प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले)

सरकारने शाळांमधील सावरकर आणि उपाध्याय यांचे फोटो काढून टाकत त्याऐवजी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावावे असे आदेश दिले आहेत. भाजप सत्तेत असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो लावले होते. परंतु हे नेते विद्यार्थ्यांचे आदर्श नसल्याची टीका भाजपने केली आहे. त्यामुळेच सत्तेत असलेल्या काँग्रेसने हे फोटो काढण्याचे आदेश दिले आहेत.