IAF | X@ColVikrantSahu

राजस्थानच्या (Rajasthan) चुरू भागामध्ये इंडियन एअर फोर्सचे फायटर जेट (IAF Fighter Jet Plane) कोसळल्याची घटना समोर आली आहे. भानुदा  गावातील ही घटना दुपारी 1 .25 ची आहे. भानुदा  गावातील शेतीच्या भागात हे विमान कोसळले, असे SHO Rajaldesar Kamlesshयांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले आहे. सुरुवातीच्या अहवालांनुसार, अपघातस्थळी मानवी शरीराचे अवयव विखुरलेल्या अवस्थेमध्ये आढळले आहेत, ज्यामुळे विमानातील वैमानिक वाचले नसल्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास आणि बचाव कार्य सुरू असल्याने अधिक तपशील लवकरच समोर येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच रतनगढमधील स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे. विमान क्रॅश झाल्यानंतर घटनास्थळी दोन मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. भारतीय हवाई दलातील दुर्घटनाग्रस्त विमान जग्वार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गुजरातमधील जामनगरजवळ हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले होते. आता ही घटना पुन्हा राजस्थान मध्ये झाली आहे. राजस्थानमधील जोधपूर आणि बिकानेर येथे हवाई दलाचे अनेक तळ आहेत.