RPS Viral Video: राजस्थान DSP आणि महिला कॉन्स्टेबल यांचा स्वीमिंग पूलमधील 'डर्टी व्हिडिओ' व्हायरल, दोघेही निलंबीत
RPS Dirty Video | (Photo Credit: Twitter)

राजस्थान पोलीस सेवेत (RPS) असलेल्या एका महिला कॉन्स्टेबल आणि पोलीस उपाधीक्षक (CO) यांचा एक कथीत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही या व्हिडिओत स्वीमींग पूलमध्ये शरीरसंबंध (RPS Dirty Video In Swimming Pool) ठेवताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे या व्हिडिओत एक 6 वर्षांचा मुलगाही दिसत आहेत. या मुलाच्या समोरच हा सर्व प्रकार घडल्याचे दिसत असल्यामुळे सोशल मीडिया आणि समाजातील विविध स्तरातून जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान पोलीस (Rajasthan Police) प्रशासनाने संबंधीत महिला कन्स्टेबल आणि पोलीस उपाधीक्षक यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

पोलीस उपाधीक्षक आणि महिला कॉन्स्टेबल यांचा कथीत 'डर्टी व्हिडिओ' व्हायरल होताच राजस्थान डीजीपी एमएल लाठर यांनी दोघांनाही निलंबीत केले आहे. तसेच प्रकरणाची चौकशी सुरु आहे. महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. (हेही वाचा, Mumbai Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरी पाठवले Sex Toys, मुंबईतील तरुणास अटक)

प्राप्त माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबल जयपूर कमिश्नरेटमध्ये कर्तव्यावस आहे तर आरपीएस अधिकारी हरीलाल सैनी ह अजमेर जिल्ह्यातील ब्यावर येथे सीओ पदावर कर्तव्यावर आहे. निलंबन काळात पोलीस लाईन जयपूर कमिश्नरेट आणि आरपीएस अधिकारी हीराला सैन पोलीस मुख्यालयात आपली हजेरी देतील. दोघांचीही विभागीय चौकशी होणार आहे.

व्हायरल व्हिडिओत दिसते आहे की, आरपीएस अधिकारी हीरालाल सैनी हा नशेत धुंद आहे. तर महिला कॉन्स्टेबल आरपीएस अधिकारी सोबत सहमतीने शरीरसंबंध ठेवत आहे. महिला कॉन्स्टेबल कॅमेऱ्याकडे पाहतानाही आढळते आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर संबंधीत आरपीएस अधिकारी आणि महिला कॉन्स्टेबल यांनी हा व्हिडिओ फेक असून, एडीट केलेला आहे असे म्हटले आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेला आपण ओळखतही नसल्याचे संबंधीत पोलीस उपनिरिक्षकाने म्हटले आहे.