IAF MiG-21 Bison crashes in Rajasthan: भारतीय हवाई दलाचे मिग-21 लढावू विमान कोसळले, 2 वैमानिकांचा मृत्यू  (व्हिडिओ)

भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) मिग-21 बायसन लढाऊ विमान कोसळल्याने (MiG-21 Bison Fighter Aircraft Crashed) अपघात घडला आहे. राजस्थान (Rajasthan) राज्यातील बाडमेर (Barmer) जिल्ह्यात ही घटना गुरुवारी (28 जुलै) संध्याकाळी घडली. मात्र, याबाबत अधिकृत वृत्त रात्री नऊच्या सुमारास पुढे आले. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

दुर्घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, या अपघातात दोन वैमानिकांनी प्राण गमावले आहेत. बाडमोर जिल्ह्यातील भीमडा गावापासून अर्धा किलोमिटर अंतरावर ही घटना घडली. विमान जमीनवर कोसळताच ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. विमानाचे अवेशसही घटनास्थळी विखूरल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसते आहे. विमानाच्या काही अंतरावर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यांच्या बोलण्याचा आवाजही व्हिडिओत ऐकू येत आहे.

ट्विट

घटनेची माहिती मिळताच परिसराचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.