प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

स्पेशल ट्रेनसाठी (Special Train)  तात्काळ कोट्याची (Tatkal Quota)  सुविधा नाही आहे. मात्र येत्या 29 जून पासून तात्काळ कोट्यासाठी बुकिंगची सुविधा सुरु होणार आहे. तसेच या कोट्यासाठी बुकिंग करण्याकरिता नियमात सुद्धा बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रवाशांना रेल्वे स्थानकात बुकिंग काउंटरच्या येथून टोकन सिस्टिमच्या माध्यमातून तिकिट बुक करता येणार आहे. श्रमिक स्पेशल ट्रेन नंतर रेल्वेने 200 स्पेशल ट्रेन सुरु केल्या आहेत. या ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तात्काळ कोट्याची यापुर्वी सुविधा दिली नव्हती. मात्र आता उद्यापासून 30 जून पासून धावणाऱ्या स्पेशल ट्रेनसाठी तात्काळ बुकिंग सुरु होणार आहे.

तात्काळ कोट्यासाठी उद्यापासून सुरुवात होणार आहे. यासाठी सर्वप्रथम प्रवाशाला पहिल्यासारखेच 24 तासाच्या आतमध्ये स्थानकात यावे लागणार आहे. येथे आल्यावर प्रवाशाला फक्त मोबाईल क्रमांकच फॉर्मवर लिहायचा आहे. प्रवाशाला त्याच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक फॉर्मवर लिहिता येणार नाही आहे. तसेच फॉर्मवर ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील पत्ता, पिन क्रमांक आणि तेथील पोस्ट ऑफिस बाबत सुद्धा माहिती द्यावी लागणार आहे.(Train Cancelled: 1 जुलै ते 12 ऑगस्ट या कालवधीमधील सर्व मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर, लोकल रेल्वेगाड्या रद्द; प्रवाशांना मिळणार तिकिटांचा Full Refund)

रेल्वेस्थानकात तात्काळ कोट्यामधून टोकन सिस्टिमच्या माध्यमातून सुविधा दिली जाणार आहे. ज्या प्रवाशांना टोकन दिले जाणार आहे त्यांना तात्काळ कोट्याचा फॉर्म भरता येणार आहे. यासाठी रेल्वेस्थानकात तयारी सुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान, देशात कोरोना व्हायरसचे महासंकट पाहता स्थलांतरित मजूरांसाठी रेल्वे प्रशासनाकडून श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप लोकल सेवा सामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या नाहीत.