गुजरातमधील आनंद रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे जाणार्या सेमी हाय-स्पीड वंदे भारत एक्स्प्रेस ( Vande Bharat Express train ) ट्रेनने 54 वर्षीय महिलेला धडक दिल्याच्या वृत्ताची पुष्टी रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. बीट्रिस आर्चीबाल्ड पीटर असे पीडितेचे नाव आहे. ट्रॅक ओलांडत असताना दुपारी 4.37 वाजता हा अपघात झाला. गुरे अथवा इतर कारणांनी रेल्वे अपघाताचे प्रमाण गुजरातमध्ये अलिकडील काळात वाढले आहे.
अहमदाबादची रहिवासी असलेलेी बीट्रिस आर्चीबाल्ड पीटर ही महिला आनंद येथे एका नातेवाईकाला भेटायला गेली होती. ही ट्रेन गांधीनगर कॅपिटल स्टेशनवरून मुंबई सेंट्रलकडे निघाली होती. दरम्यान, हा अपघात घडला.
ट्विट
54-year-old woman run over by Vande Bharat Express train near Anand in Gujarat: Railway Police
— Press Trust of India (@PTI_News) November 8, 2022
गेल्या महिन्यात दिल्लीतील बदली यार्ड आणि होलंबी दरम्यान ३ जण ट्रेन अपघातात मृत्यूमुखी पडले होते. मोहम्मद हाफिज, मोहम्मद शाहरुख (दोघेही नातेवाईक) आणि रियाझुल अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व 19 ते 21 वयोगटातील आहेत. हे तिघे आणि चौथा व्यक्ती मोहम्मद एहसान, जो त्यांच्यासोबत काम करतो आणि राहतो, जवळच्या उद्यानात गेला होता आणि आपल्या घरी परतत होता, असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.