Rail Budget 2019 (Photos Credits: File Photo)

Railway Budget 2019: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) आज 2019-20 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. लोकसभा निवडणूक 2019 पूर्वी फेब्रुवारी 2019 मध्ये पीयुष गोयल (Piyush Goel) यांनी अंतरिम बजेट सादर केलं होतं. यापूर्वी रेल्वे बजेट सर्वसाधारण बजेटच्या एक दिवसापूर्वी सादर होत असे. मात्र मोदी सरकारने 92 वर्षांची परंपरा मोडीत काढून रेल्वे बजेट आणि सर्वसाधारण बजेट एकाच दिवशी केले. (अर्थसंकल्पातील अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, रस्ते आणि रेल्वे मार्गांवरील भार कमी करण्यासाठी जलमार्गांचा अधिकाधिक वापर  करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसंच रेल्वेसेवा अद्यावत करण्यासाठी 50 लाख कोटींची गरज आहे. यातून रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी विकास केला जाईल. त्याचबरोबर रेल्वेच्या विकासासाठी पीपीपी (Public Private Partnership) मॉडल लागू केले जाईल.

ANI ट्विट:

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हे पहिलेच बजेट असून यात रेल्वेसाठी काय तरतुदी केल्या जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.