Rahul Gandhi On SC Verdict: सर्वोच्च न्यायालयाच्या दिलासादायक निर्णयावर राहुल गांधी यांनी दिली 'अशी' पहिली प्रतिक्रिया
Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter/ANI)

'मोदी' आडनावावरून केलेल्या टीप्पणीवरून खासदारकी गमावलेल्या राहुल गांधी यांना आज सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. यानंतर कॉंग्रेस मध्ये पुन्हा चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. कार्यकर्त्यांनी नाचून आपला आनंद व्यक्त केला आहे. दिल्लीच्या कॉंग्रेस मुख्यालयामध्ये मिठाई देखील वाटली आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 'Come what may, my duty remains the same.'असं ट्वीट केले आहे.

गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा दिल्याने राहुल गांधी यांना आपली खासदारकी गमवावी लागली होती. राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बी. आर. गवई, जस्टिस पी. एस. नरसिंहा आणि जस्टिस संजय कुमार यांच्याखंडपीठासमोर सुनावणी झाली. राहुल गांधींची बाजू कोर्टात अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडली तर समोरून महेश जेठमलानी युक्तिवाद करत होते.

पहा राहुल गांधी यांचे ट्वीट

कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आनंद

राहुल गांधी यांच्या खटल्यामध्ये शिक्षा सुनावताना गुजरात न्यायालयाने सर्वाधिक 2 वर्षांची शिक्षा का सुनावली ? असा प्रश्न विचारला आहे. त्यांची खासदारकी रद्द व्हावी म्हणून ही शिक्षा सुनावण्यात आली का? त्यापेक्षा एक दिवसाची शिक्षा जरी कमी असती तर त्यांची खासदारकी रद्द झाली नसती. त्यामुळे या प्रकरणातील जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली हे हेतुपुरस्सर करण्यात आलं का?” असा सवालही कोर्टाने उपस्थित केला आहे.