Rahul Gandhi | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दिल्ली येथील रामलीला (Ramlila Ground) मैदानावरुन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Rahul Gandhi On PM Narendra Modi) आणि भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जिंकण्यासाठी भाजपने '400' पारचा नारा दिला आहे. भाजपला एक लक्ष्य पार करायचे तर केवळ 'मॅच फिक्सींग' केल्यानेच होऊ शकते. जर भाजपने मॅच फिक्सींग केले नाही तर त्यांना हे लक्ष्य गाठणे केव्हाही शक्य होणार नाही. आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भाजपने पाच पंचही निवडले आहेत, जे EVM च्या माध्यमातून मॅच फिक्सींग करु शकतील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने 21 मार्च रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली. त्याविरोधात विरोधकांनी आयोजित केलेल्या 'लोकतंत्र बचाओ' रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, देशात भाजपला फेरफार करुन निवडणूका जिंकायच्या आहे. मॅच फिक्सींग करुन सत्तेत यायचे आहे. एकदा का हे लोक मॅच फिक्सींग करुन सत्तेत आले की, त्यांना संविधान बदलाचे आणि संपवायचे आहे. एकदा का संविधान बदलले की या देशात कोणालाच स्वातंत्र्य असणार नाही. ना आरक्षण राहणार, ना हक्क. पण हे सर्व करणे त्यांना प्रामाणिकपणे शक्य नाही. केवळ EVM फेरफार, प्रसारमाध्यांवर दबाव अशा गोष्टी केल्यानेच भाजप जिंकू शकते. भाजपला मॅच फिक्सिंग करुन जिंकू न देणे हिच प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भाजपने काहीही केले तरी ते मॅच फिक्सिंग केल्याशिवाय ते जिंकू शकत नाहीत. ईव्हीएम, मॅच फिक्सिंग, सोशल मीडिया आणि प्रेसवर दबाव आणल्याशिवाय ते (भाजप) 180 पेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray On INDIA Bloc Rally: 'अब की बार भाजपा तडीपार', उद्धव ठाकरे यांचा दिल्ली येथून नारा; Loktantra Bachao रॅलीत घणाघात)

राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, शरद पवार आणि तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडीच्या अटकेविरोधात आज (31मार्च) रोजी राष्ट्रीय राजधानीतील रामलीला मैदानावर 'लोकतंत्र बचाओ रॅली'चे आयोजन केले आहे. या रॅलिला भारतभरातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. या सर्वांनी केंद्र सरकारवर तीव्र स्वरुपाची टीका केली तसेच केजरीवाल आणि सोरेन कुटुंबीयांना धीर दिला. देशातील जनतेला उद्देशून बोलताना भाजप सरकार सत्तेतून हकलून लावण्याचे अवाहनही या सर्वांनी देशाच्या नागरिकांना केले. या रॅलीवर सत्ताधारी गटाकडून काय प्रत्युत्तर येते याबाबत उत्सुकता आहे.