Shiv Jayanti 2019:  शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी राहुल गांधी यांचं खास मराठी भाषेतून ट्विट!
Congress President Rahul Gandhi (Photo Credits: Getty Images)

Shivaji Maharaj Jayanti 2019: शिवजयंतीचं औचित्य साधून सामान्य नागरिकांसोबतच आज अनेक राजकीय मंडळींनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहे. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या शिवरायांचा आज जन्म दिवस आहे. शिवरायांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आज सोशल मीडियातून राहुल गांधी यांनी चक्क मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या आहेत. Shivaji Maharaj Jayanti 2019: शिवाजी महाराज जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवरायांचरणी नतमस्तक (Video)

राहुल गांधी यांचं ट्विट

राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना शिवाजी महाराज की जयचा नारा दिला आहे. सोबत ट्विटमध्ये शिवरायांच्या पराक्रमाला गौरवण्यात आलं आहे. Shivaji Maharaj Jayanti 2019: शिवजयंती विशेष WhatsApp Status, Quotes, Wishes,Messages आणि शुभेच्छापत्र!

आगामी लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर सध्या महराष्ट्रासह देशभरात प्रचारांना सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसचा प्रचाराचा नारळ धुळे जिल्ह्यातून फूटण्याची चर्चा आहे. लवकरच नरेंद्र मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रात राहुल गांधींच्या प्रचाराला सुरूवात होईल.