नरेंद्र मोदी यांच्या #MainBhiChowkidar या नव्या फंड्यावर राहुल गांधी यांचे खोचक ट्विट
Congress president Rahul Gandhi-Prime Minister Narendra Modi | (Photo Credit: PTI)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. उमेदवार यादी जाहीर करण्यासोबतच निवडणूक प्रचारासाठी विविध फंडे वापरले जात आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मैं भी चौकीदार' हे गाणे ट्विटरवर शेअर करत भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या गाण्यात सरकाराने आतापर्यंत केलेल्या कामांचे दर्शन घडते. मात्र मोदींच्या या नव्या प्रचार फंड्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खोचक ट्विट करत आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. #MainBhiChowkidar गाण्याचा व्हिडिओ शेअर करत नरेंद्र मोदी यांचे भाजप प्रचार अभियान सुरु

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, "बचावात्मक ट्विट मि. मोदी. तुम्हाला थोडेसे अपराधी वाटत आहे ना?" या ट्विटसोबत राहुल गांधी यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यात नरेंद्र मोदींच्या मागे अनिल अंबानी, विजय मल्ला, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, गौतम अदानी आणि जय शाह यांसारख्या लोकांचे फोटो आहेत.

राहुल गांधी यांचे ट्विट:

राहुल गांधी यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौकीदार म्हणून टीका केली आहे. यावर या व्हिडिओच्या माध्यमातून मोदींनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. 'मैं भी चौकीदार' हे गाणे शेअर करत मोदींनी भ्रष्टाचार, समाज्यातील वाईट गोष्टी, अस्वच्छता याविरुद्ध लढत असणारा आणि देशाच्या विकासासाठी झटत असलेला प्रत्येक भारतीय चौकीदार आहे, असे म्हटले आहे.