कोरोनाची स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार कमी पडले असल्याची टिका विरोधकांकडून सतत केली जात आहे. दरम्यान ट्विटरद्वारे उघडपणे एकमेकांवर टिकास्त्र सोडण्याची संधी देखील सत्ताधारी तसेच विरोधक सोडत नाही. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोरोनाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. 'एक तर महामारी त्यात पंतप्रधान अहंकारी’, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. राहुल यांच्या टीकेमागे संदर्भ आहे. तो म्हणजे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या विधानाचा.
केंद्र सरकारने लसींचा पुरेसा स्टॉक नसल्याचं माहीत असतानाच लसीकरण मोहीम सुरू केली. शिवाय 45 आणि नंतर 18 वर्षांवरील व्यक्तिंनाही लस देण्याची घोषणा केली. केंद्राकडे कोणतंही नियोजन नव्हतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईनकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असं जाधव यांनी म्हटलं होतं. जाधव यांच्या या वक्तव्याची बातमीही राहुल यांनी ट्विटमध्ये शेअर केली आहे.हेदेखील वाचा- Lockdown in Delhi: दिल्लीत एका आठवड्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला; कोरोनामुळे प्राण गमावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना मिळणार 1 कोटी रुपयांची भरपाई
एक तो महामारी,
उस पर प्रधान अहंकारी! pic.twitter.com/fO0GzXBpvL
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 23, 2021
दरम्यान, राहुल यांची केंद्रावर टीका सुरूच आहे. चार दिवसांपूर्वीही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्रातील मोदी सरकारने कोरोना महामारी रोखण्यासाठी रणनीती तयार केली आहे. त्यावर राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. या पूर्वीही त्यांनी पीएम केअर्स फंड आणि पीएम मोदी खोटारडे असून काम करण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. येणाऱ्या काळात लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता असेल. अशावेळी पेडियाट्रिक सर्व्हिसेस आणि व्हॅक्सिन ट्रिटमेंट प्रोटोकॉल आधीच तयार करावा लागेल. मोदी सिस्टिमला झोपेतून उठावं लागणार आहे. ही भविष्यातील गरज आहे, असं राहुल म्हणाले होते.