प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानावरून लोकसभेत (Loksabha) गदारोळ पाहण्यास मिळाला. राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील सहा महिन्यात घरातून बाहेरही पडता येणार नाही या देशातील युवाच त्यांना दांडे मारतील असे म्हंटले होते, इतकंच नव्हे तर त्यांनी मोदींचा उल्लेख सुद्धा एकेरी भाषेत केला होता. या विधानावरून काल मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना मजेशीर पद्धतीने समाचार सुद्धा घेतला होता. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा या विधानावरून वाद झाला, हा वाद शाब्दिक चकमकीवर न थांबता काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) मध्ये चक्क सभागृहातच धक्काबुक्की देखील पाहायला मिळाली. या प्रसंगानंतर राहुल यांनी आपल्या पक्षाचे धक्काबुक्कीत सामील असणारे खासदार मनिकम टैगोर यांची बाजू मांडत तुम्ही कॅमेरे तपासून पहा टागोर यांच्यावर उलट हल्ला झाला आहे असे म्हणणारे एक ट्विट केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, डॉ. हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेताना. देशाच्या पंतप्रधानांबाबत एखादा माणूस ही भाषा कशी काय वापरु शकतो? लोक पंतप्रधानांना लाठीने मारतील असं राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. राहुल गांधी यांचे वडीलही देशाचे पंतप्रधान होते. अशा माणसाने तरी पंतप्रधानपदाचा आदर ठेवायला हवा अशा शब्दात सुनावले होते, ज्यावर, राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षाकडे माझ्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नसल्याने हे असले मुद्दे उचलून धरले जात आहेत असे उत्तर देण्यात आले. राहुल गांधी यांना मुंबई कोर्टाचा समन्स, 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

दरम्यान, राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, ते पंतप्रधान असल्यासारखे भासतच नाहीत असेही म्हंटले आहे, पंतप्रधान कसा असतो त्याची बोलण्याची, वागण्याची, उंचीची एक ओळख आहे, मात्र मोदींकडे असे काहीच नाही त्यामुळे ते पंतप्रधान वाटतच नाही असेही म्हंटले आहे. ते पाकिस्तान, जवाहरलाल नेहरू, इत्यादी मुद्द्यांवर बोलतात मात्र बेरोजगारीसारखा मूळ मुद्दा भाषणात उच्चारत सुद्धा नाहीत असाही सुर काल राहुल गांधी यांनी धरला होता