Rahul Gandhi Attacks PM Modi: राहुल गांधी यांनी जीएसटी आणि देशातील अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा केंद्रावर केला हल्लाबोल, ट्विट करत म्हटली 'ही' मोठी गोष्ट
राहुल गांधी आणि पीएम मोदी (Photo Credit: PTI)

देशातील एका बाजूला कोरोना व्हायरसचे महासंकट दिवसागणिक वाढत चालले आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस वेळोवेळी केंद्र सरकारला घेरत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये वाढते कोरोनाचे संक्रमण असो किंवा चीन सोबत बॉर्डरवर सुरु असलेला तणाव. काँग्रेस कडून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्याकडून केंद्रावर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभुमीवर पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी देशातील अर्थव्यवस्था आणि जीएसटी संदर्भात पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत असा सवाल उपस्थितीत केला आहे की,तुमचे मुख्यमंत्री मोदींचे भविष्य कशासाठी गहाण ठेवत आहेत?

पुढे राहुल गांधी यांनी ट्विट मध्ये असे ही म्हटले की, राज्यांसाठी केंद्राने जीएसटी राजस्वचे आश्वासन दिले होते. देशाची अर्थव्यवस्था पीएम मोदी आणि कोरोना व्हारसमुळे तळागाळाला गेली आहे. पंतप्रधानांनी कॉरपोरेट्सला 1.4 लाख कोटी रुपयांचे टॅक्स कट केले. 8400 कोटींचे स्वत:साठी 2 विमाने खरेदी केली. राज्यांना पैसे देण्यासाठी केंद्राकडे पैसेच नाही. अर्थमंत्री म्हणतात उधारी.(Indian Economy: 2050 पर्यंत जपानला मागे टाकून भारत बनेल जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था- Lancet)

दरम्यान, देशाची ढासळती अर्थव्यवस्था, जीडीपी, कोरोना व्हासच्या रुग्णांची वाढती प्रकरणे पाहता राहुल गांधी नेहमीच केंद्र सरकारवर टीका करताना दिसून येतात. तर देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 70 लाखांच्या पार गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा रविवार पर्यंत 10 लाख 53 हजार 807 वर पोहचली आहे.