Rahul Gandhi on PM Narendra Modi: 'काळी जादू, अंधश्रद्धेची भलावण थांबवा पंतप्रधान पदाची बेईज्जती करणे बंद करा'; राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर प्रहार
Rahul Gandhi & PM Narenrda Modi (Photo Credit - FB/PBI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसने (Congress) केलेल्या आंदोलनावर जोरदार टीका केली. ही टीका करताना तुम्ही कितीही जादू-टोणा करा, काळी जादू करा. जनतेचा विश्वास तुम्ही दुसऱ्यांदा कमावू शकणार नाही, असे म्हटले. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार (Rahul Gandhi Attack on PM Narendra Modi) केला आहे. पंतप्रधानांना महागाई दिसत नाही? बेरोजगारी दिसत नाही? असा सवाल विचारत राहुल यांनी म्हटले आहे की, केवळ आपली कृत्ये लपविण्यासाठी काळी जादू, अंधश्रद्धा यांसारख्या मुद्द्यांचा ते आधार घेत आहेत. पंतप्रधानांनी अशी वक्तव्य बंद करावे. त्यातून होणारी पंतप्रधान पदाची बेईज्जतीही बंद करावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांच्या होत असलेल्या चौकशीला काँग्रेसने तीव्र विरोध केला होता. हा विरोध नोंदवताना महागाई, बेरोजगारी आणि ईडी चौकशी अशा विविध मुद्द्यांवरुन काँग्रेसने 5 ऑगस्ट रोजी संसद आणि संसदेबाहेर आंदोलन केले होते. या वेळी निशेध म्हणून अनेक काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे घालून केंद्र सरकारचा विरोध केला होता. याच घटनेचा मुद्दा बनवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवल काळी जादू म्हणत हल्लाबोल केला होता. (हेही वाचा, Rahul Gandhi on PM Narendra Modi: 'काय कराचं ते करा! आम्ही नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही', राहुल गांधी आक्रमक)

हरियाणा येथी गरीबांना मोफत राशन देण्यापूर्वी 20 रुपये देऊन तिरंगा खरेदी करण्याची सक्ती केली होती. या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्ट लिहीत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. या संपूर्ण घटनेबाबत राहुल गांधी यांनी म्हटले होते की, तिरंगा हा आमचा अभिमान आहे. तिरंगा प्रत्येकाच्या हृदयात असतो. राष्ट्रवाद कधीही विकला जाऊ शकत नाही. राष्ट्रध्वज विक्रीची सक्ती करणे हे अत्यंत शरमेची बाब आहे. राशन देण्याच्या नावाखाली गरिबांकडून जबरदस्तीने 20 रुपये वसूल केले जात आहेत. भाजप सरकार आता तिरंग्याच्या माध्यमातून गरिबांच्या आत्मसन्मानावरही प्रकार करत आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी 21 ऑगस्ट पासून निवडणूक सुरु होईल. राहुल गांधी यांनी या पदासाठी निवडणूक लढणार आहेत किंवा नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पक्षानेही यापूर्वी अनेकदा याबाबत भूमिका मांडली आहे. परंतू, त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष पदाच्या भूमिकेवरुन राहुल गांधी यांच्या मनात नेमके आहे तरी काय याबाबत उत्सुकता कायम आहे.