Raghuram Rajan (Photo Credits: IANS)

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus संदर्भात जगभरातील देशांना सल्ला दिला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे नंतर पाहा. आगोदर कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, असे राजन यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून मी पाहतो आहे की, आम्ही जगभरातील देशांच्या आणि एकूणच जगाच्या अर्थव्यवस्थेचे काय होणार या चिंतेत आहोत. पण, आम्ही प्रथम कोरोना व्हायरसला (COVID-19) आळा घालण्याबाबत पावले टाकायला हवीत. रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund)चे मुख्य अर्थतज्ज्ञही राहिले आहेत. सध्या ते बूथ स्कूल ऑफ बिजनेस येथे प्रोफेसर आहेत.

रघुराम राजन यांनी ब्लूमबर्ग टीव्हीच्या हॅडी स्ट्राउट व्हॉट्स आणि शेर अहन यांच्या माध्यमातून सांगितले की 'लोक अपेक्षा करतात की, कोरोना व्हायरसच्या प्रसाराचीही एक मर्यादा असू शकते. कारण त्याच्यावर सुरु असलेल्या संशोधानतून नक्कीच काहीतरी उपाय हाती लागू शकतो. अशा वेळी मी एकच सांगू शकतो की, आम्ही अर्थव्यवस्था किंवा इतर विशयांपेक्षा कोरोना व्हायरसविरुद्ध लढणे अधिक महत्त्वाचे आहे.'

कोरोना व्हायरसमुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असे मत अनेक अर्थतज्ज्ञानी व्यक्त केले आहे. बँक ऑफ अमेरिका कार्पोरेशनच्या अर्थतज्ज्ञांनी गुरुवारी इशारा दिला की, आता या वर्षी ते 2% इतक्याच जागतिक विकासदराचा आपेक्षा करतात. जो 2009 नंतर पहिल्यांदाच इतका कमी दिसत आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम विविध देशांतील कंपन्या आणि उद्योगांवरही झाला आहे, असी पुस्तीही त्यांनी जोडली. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस जागतिक अर्थव्यवस्थेवर करतोय नकारात्मक परिणाम?)

दरम्यान, चीन हा कोरोना व्हायरसचा उगमस्त्रोत ठरला आहे. चीनमध्येही मोठ्या प्रमाणावर कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळात आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा चीनी शेअर बाजारावर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे. हा परिणाम दृश्य रुपात पाहायला मिळत आहे. चीनच्या शेन्जेन आणि शंघाई स्टॉक मार्केटमध्ये 3.52 आणि 2.75 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे.