Border Security Force (BSF) (Photo Credits: Wikimedia Commons)

पंजाबच्या अटारी बॉर्डर (Attari Border) वर सीमा सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांनी देशात घुसखोरी करण्याचा प्रयतन करणार्‍या दोघांना ठार मारले आहे. यामध्ये सुरक्षा दलाकडून त्यांच्याकडील हत्यारं ताब्यात घेण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, अमृतसर नजीक असलेल्या अटारी बॉर्डरवर 2 घुसखोर सीमा पार करून देशात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना बीएएस (Border Security Force) कडून रोखण्याचा प्रयत्न होताच त्यांनी फायरिंग सुरू केले. या चकमकीत त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. सध्या सुरक्षा रक्षकांकडून या भागाला वेढण्यात आले असून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

काही दिवसांपूर्वीच म्हणजे रविवार 13 डिसेंबरला जम्मू कश्मीर मध्ये सुरक्षादलाकडून 2 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. त्यांना पुंछ मधून ताब्यात घेण्यात आले होते. राज्याचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या भागात डीडीसी मतदान सुरू आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात आतंकवादी संघटनेचे काही आतंकवादी कश्मीर मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चोख सुरक्षा व्यवस्था ठेवत त्यांचे मनसुबे हाणून पाडले जातील.

ANI Tweet

जम्मू कश्मीर मधील काही भागातही इंटरनॅशनल बॉर्डर वर मागील आठवड्यात ड्रोन देखील दिसलं होतं अशी माहिती रणबीर सिंह पुरा यांनी दिली होती. त्यावरही बीएसएफ कडून हल्ला करण्यात आला होता. सध्या सीमेवर जवानांना दक्ष राहण्याचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत.