Punjab: अटक करण्यात आलेले IAS अधिकारी Sanjay Popli यांच्या मुलाची आत्महत्या; दक्षता पथकाच्या छाप्यादरम्यान स्वत:वर झाडली गोळी
Representational Image (Photo Credits: File Image)

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले पंजाबचे (Punjab) आयएएस अधिकारी संजय पोपळी (Sanjay Popli) यांचा मुलगा कार्तिक पोपळी (26) याचा शनिवारी त्याच्या चंदीगड येथील निवासस्थानी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. कार्तिकच्या डोक्यात गोळी लागली आहे. कार्तिकला 7.62 मिमीची गोळी लागली आहे. कार्तिकने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचवेळी, व्हिजिलंस आपल्या मुलावर अत्याचार करत असल्याचा आरोप कार्तिकच्या आईने केला आहे.

विजिलंस कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलावर गोळी झाडली, असे त्या म्हणाल्या आहेत. दुसरीकडे पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोपळी यांच्या मुलाने परवाना असलेल्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडल्याचे पोलिसांनी सांगितले. हे पिस्तूल सीलबंद केले आहे.

पंजाब व्हिजिलंट टीमने गेल्या आठवड्यात आयएएस अधिकारी संजय पोपळी यांना चंदीगड येथून भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून व्हिजिलंस पथक त्यांच्याविरुद्ध तपास करत होते. शनिवारी व्हिजिलंस पथक तपासासाठी सेक्टर-11 ए येथील पोपळी यांच्या कोठी क्रमांक 520 मध्ये पोहोचले होते. त्यावेळी व्हिजिलंस पथकाने संजय पोपळी यांनाही सोबत आणले होते. यादरम्यान कार्तिक पोपळीने स्वत:वर गोळी झाडली. कार्तिकने रिव्हॉल्व्हरने आपल्या कपाळावर गोळी मारली. त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी पीजीआयमध्ये नेण्यात आले, मात्र पीजीआयच्या प्रगत ट्रॉमा सेंटरमधील डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले.

कार्तिक हा पोपळी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. यावेळी कार्तिक वकिलीची तयारी करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो व्हिजिलंस तपासामुळे चिंतेत होता. आता व्हिजिलंस पथकाने आपल्या मुलावर प्राणघातक हल्ला केला असून, त्यांनीच मुलाला गोळ्या घातल्याचा आरोप संजय पोपळी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, आयएएस अधिकारी संजय पोपळी यांची पंजाब सरकारमध्ये पेन्शन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी दक्षता ब्युरोने त्यांना चंदीगड येथून अटक केली होती. एका प्रकल्पात त्यांनी 1 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यामध्ये 3.50 लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी दबाव आणल्यानंतर, हरियाणाच्या कर्नालच्या कंत्राटदाराने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक हेल्पलाइनकडे तक्रार केली. त्यानंतर पोपळीला अटक करण्यात आली. (हेही वाचा:  हैद्राबादमध्ये भोलकपूर परिसरात विजेची तार पडल्याने तरुणाचा मृत्यू)

संजय पोपळी यांच्या अटकेनंतर दक्षता विभागाने त्यांच्या चंदीगड येथील सेक्टर 11 येथील घराची झडती घेतली. तेथून 73 काडतुसे सापडली. यामध्ये 7.65MM ची 41 काडतुसे, .32 बोअरची 2 आणि .22 बोअरची 30 काडतुसे आहेत. त्यामुळे पोपळीवर शस्त्रास्त्र कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.