Hyderabad Shocker: हैद्राबादमध्ये भोलकपूर परिसरात विजेची तार पडल्याने तरुणाचा मृत्यू
Youth Electrocuted (credit - IANS)

Hyderabad Shocker: हैद्राबाद (Hyderabad) मध्ये एक तरुणाच्या अंगावर विजेची तार पडली. विजेचा धक्का लागून या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री शहरातील भोलकपूर परिसरात (Bholakpur Area) घडली. हा तरुण मोटारसायकल चालवत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वायर डीसीएम व्हॅनमध्ये अडकली आणि तुटली. व्हॅनच्या पाठीमागून दुचाकी चालवणाऱ्या तरुणाच्या अंगावर ही वायर पडली. (हेही वाचा - President Election 2022: मायावती यांचा NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर)

यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद समीर असे या तरुणाचे नाव होते. मोहम्मद हा कादिर या समोसा विक्रेत्याचा मुलगा होता. वडिलांनी पुरवलेल्या समोशासाठी काही हॉटेल्समधून देय रक्कम जमा करून समीर घरी परतत होता.

वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेचा मुशीराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.