President Election 2022: मायावती यांचा NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर
Mayawati | (Photo Credits: PTI/ file photo)

President Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बसपा प्रमुख मायावती (Mayawati) यांनी एनडीए (NDA) च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मायावती शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'आम्ही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.' बसपा एनडीए किंवा यूपीएच्या मागे असलेला पक्ष नाही, असेही मायावती यांनी यावेळी स्पष्ट केलं.

यासंदर्भात बोलताना मायावती म्हणाल्या की, बसपा हा स्वतंत्र आणि निर्भय पक्ष आहे. देशातील मागासलेल्या आणि उपेक्षित घटकांसाठी कोणत्याही पक्षाने काम केले तर बसपा त्याच्या पाठीशी उभा राहील. मग तो निर्णय आपल्या विरोधात कितीही घातक ठरला तरी चालेल. (हेही वाचा - Amit Shah On Gujarat Riots: गुजरात दंगल प्रकरणावर प्रथमच सविस्तर बोलले अमित शाह, सांगितले 2002 मध्ये काय घडले)

मायावती पुढे बोलताना म्हणाल्या की, बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या तत्त्वांवर काम करणे हा बसपचा उद्देश आहे. विशेषत: पत्रकार परिषदेत काँग्रेसवर निशाणा साधत मायावती म्हणाल्या की, काही लोक बसपाला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आमचे आमदार फोडण्याचे काम केले जाते. यूपीमध्ये बसपच्या नेतृत्वाखाली सरकारने नेहमीच दीन-दलित, शोषित आणि दलितांच्या हितासाठी काम केले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत बसपने दुर्लक्ष झालं असल्याचंही मायावतींनी म्हटलं आहे. मायावती पुढे बोलताना म्हणाल्या की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी मनमानी केल्याचे पाहायला मिळाले आणि बसपाला विरोधकांनी एकाकी ठेवले. प्रथम पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडक लोकांना एकतर्फी बोलावणे. त्यानंतर शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत बसपकडे दुर्लक्ष करणे, ही त्यांची एकजूट आहे.