पंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा
झाकीर मूसा ( फोटो सौजन्य- ANI )

दहशतवादी संघटना अल कायदाचा जम्मू काश्मिरमधील कमांडर झाकीर मूसा (Zakir Rashid Bhat ) दिसल्याने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच पंजाब पोलिसांनी या कुख्यात दहशतवाद्यापासून वाचण्यासाठी त्याचे फोटो ठिकठिकाणी लावले आहेत.

मूसा हा अमृतसरमध्ये दिसल्याचे वृत्त समोर येताच पोलिसांनी त्वरीत हालचाल सुरु केली आहे. तसेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच गुप्तचर विभागाकडून मूसा आणि हिजबूलचे दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे समजले होते. त्यानंतर हिजबूलचे दहशतवादी काश्मिरमधील पुलवामा येथे दिसून आले होते. तसेच गुरुदारपुरच्या पोलिसांनी असे सांगितले की, त्यांनी मूसा हा अमृतसरजवळ असल्याचे कळले होते. त्यामुळेच आम्ही सतर्कतेचा इशारा देऊन त्याचे फोटो ठिकठिकाणी लावले आहेत. तर अतिरिक्त सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत.

या कुख्यात दहशतवाद्यामुळे पंजाबमध्ये सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांनकडून देण्यात आले आहेत.