Punjab: तुरुंगातील VIP संस्कृतीला सुरुंग, व्हाइट कॉलर गुन्हेगारांना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा धक्का; कारागृहातील व्हीआयपी खोल्या मोडीत
Bhagwant Mann (PC - Facebook)

पंजाबमधील कारागृहांमध्ये असलेल्या व्हीआयपी संस्कृतीला ( VIP Cells in Punjab Jails) चाप लावण्यात आला आहे. कारागृहात असलेल्या व्हीआयपी खोल्या आता मोडीत काढून त्या कर्मचारी आणि कारागृह प्रशासनासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची आता देशभर चर्चा होत आहे. पंजाबमध्ये सत्तांतर होऊन अवघ्ये काहीच दिवस झाले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) प्रथमच पूर्ण बहुमतातील सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दावा केला की त्यांच्या सरकारने 50 दिवसांच्या आत उपाययोजना केल्या आहेत. जे नियम, संस्कृती 50 वर्षांपासून चालत आली होती. मात्र ज्यात बदल करणे आवश्यक होते. आमच्या सरकारने ते केवळ 50 दिवसांमध्ये करुन दाखवले आहे. यापुढेही अनेक महत्त्वाचे आणि चांगले बदल झालेले पाहायला मिळतील असेही मान यांनी म्हटले.

तुरुंगातील सर्व व्हीआयपी खोल्या कारागृह प्रशासनासाठी वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळे सहाजिकच कारागृहात चालणारे व्हीआयपी कल्चरही मोडीत निघाले आहे. या निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री मान म्हणाले, "व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या दृष्टिकोनातून आणि तुरुंगातील सर्व व्हीआयपी खोल्यांचे तुरुंगातील कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी तुरुंग व्यवस्थापन ब्लॉकमध्ये रूपांतरित केले जाईल. तुरुंगात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल. (हेही वाचा, Free Electricity in Punjab: Bhagwant Mann सरकारचे पंजाबच्या नागरिकांना मोठे गिफ्ट! 1 जुलैपासून सर्व घरांमध्ये मिळणार 300 युनिट मोफत वीज)

आम आदमी पार्टी (आप) नेत्याने ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, तुरुंगात असलेल्या गुंडांकडून 700 हून अधिक मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच कारागृह परिसरातून गुंडांचे 710 मोबाईल फोन जप्त केले आहेत. कारागृहात फोन आणणाऱ्यांवरही आम्ही कारवाई केली. या प्रकरणांचा तपास विशेष तपास पथक करणार आहे. एफआयआर नोंदवण्यात आले आहेत आणि काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.