पुलवामा:  CRPF जवानांवर दहशतवाद्यांकडून पुन्हा ग्रेनेड हल्ला, एक जवान जखमी
Pulwama (Photo Credits: Twitter/ ANI)

Pulwama Grenade Attack: आज सकाळी श्रीनगर-जम्मू हायवेवर (Jammu Srinagar Highway ) बनिहाल बोगद्याजवळ कार नजीक स्फोट झाल्यानंतर आता पुन्हा काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. पुलवामा (Pulwama) येथील एसबीआय बॅंकेजवळ (SBI branch) CRPF कॅम्प हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एक सीआरपीएफ जवान किरकोळ जखमी झाला आहे. सकाळपासूनच सैन्यदलाकडून काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरु आहे. ग्रेनेड हल्ल्यामध्ये फार नुकसान झालं नसल्याची माहिती देण्यात आली आहे. जम्मू-काश्मिर येथे महामार्गावर कारमध्ये स्फोट, सीआरपीएफच्या ताफ्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा कट? तपास सुरु

ANI Tweet

14 फेब्रुवारी दिवशी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे भारतीय सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. मध्ये 40 जवान जागीच ठार झाले होते. त्यानंतर सातत्याने भारत पाकिस्तान सीमेवर चकमक सुरु आहे. पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून भारतीय जवानांनी एअर स्ट्राईक केले त्यांनतर मिशन शक्ती लॉन्च करण्यात आलं. या घटनांच्या पार्श्वभूमीवर काश्मीर सतत धुमसत आहे.