जम्मू-काश्मिर येथे महामार्गावर कारमध्ये स्फोट, सीआरपीएफच्या ताफ्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा कट? तपास सुरु
जम्मू-काश्मिर येथे महामार्गावर कारमध्ये स्फोट (फोटो सौजन्य-ANI)

जम्मू-काश्मिरच्या (Jammu-Kashmir) बनिहाल (Banihal) मध्ये जम्मू-श्रीनगर महामार्गावर कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. जवार भोगद्याच्या येथे घटना घडली असून कारमधील सिलेंडरचा स्फोट झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,सीआरपीएफचा ताफा तेथून जात होता. त्याचवेळी स्फोट झाल्याने महार्गावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु स्फोटात कोणतीही जीवतहानी झाली नसून तपासणी सुरु करण्यात आली आहे.

सीआरपीएफच्या सूत्रांनुसार, स्फोट झाल्याने कारचे तुडके सर्वत्र उडाले आहेत. तर कार चालकाने घटनास्थळापासून पळ काढला आहे. जवानांचा ताफा स्फोट घडवून आणलेल्या ठिकाणापासून दूरवर होता. तर स्फोट एवढा भयानक होता की दूर असल्यामुळे फक्त एका बसचे नुकसानासह जवान सुरक्षित आहेत.(हेही वाचा-जम्मू-काश्मिर: जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश)

ANI ट्वीट:

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा मध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. तर भारतीय वायुसेनेने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत बालकोट येथील मुख्य तळ उद्धवस्त करुन लावली होती.