जम्मू-काश्मिर: जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: IANS)

जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) मधील बडगाम (Budgam) येथे दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात येत आहे. तर भारतीय सुरक्षादलाचे जवान त्यांच्या गोळीबाराला प्रतिउत्तर देत असून यामध्ये जैश-ए-मोहम्मद (Jaish-E-Mohammad) संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

सुत्सू गावात 2-3 दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दोन्ही गटाकडून जोरदार गोळीबार करण्याच येत आहे. तर ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्रसाठा आढळून आला असून अद्याप या गोळीबाराची पूर्णपणे माहिती देण्यात आलेली नाही.(हेही वाचा-जम्मू-काश्मीर: भारतीय सेनेचे ऑपरेशन ऑलआउट सुरु; शोपिया येथील चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा)

ANI ट्वीट:

यापूर्वी शोपिया येथे गोळीबार सुरु होता. त्यामध्ये सुरक्षादलांनी हिज्बूल या संघटनेच्या दशहतवादी रमीज अहमद डार ह्याला जिवंत पकडले होते. तर गेल्या 24 तासामधील ही तिसरी चकमक असल्याची माहिती दिली जात आहे.