प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

पुलवामा (Pulwama)  येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील आयईडी स्फोटकं बनवण्यासाठी अ‍ॅमेझॉन (Amazon E- Shopping Site)  या साईटवरुन कच्चा माल विकत घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास पथकाच्या (NIA) चौकशीतून समोर आली आहे. याप्रकरणी एनआयएने शुक्रवारी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही संशयतीनःसए चौकशी करत असताना एका व्यक्तीने आपण अ‍ॅमेझॉन वरून रसायनांची खरेदी करत असल्याची कबुली दिली. Pulwama Terror Attack निषेधार्थ काश्मिरी तरूणांवर होणार्‍या हल्ल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारसह, 10 राज्यांना नोटिस

प्राप्त माहितीनुसार, एनआयएने शुक्रवारी श्रीनगर च्या बाग-ए-मेहताब या भागातून वजीर-उल-इस्लाम (वय 19 ) आणि पुलवामा मधील हकरीपुरा गावाचा मोहम्मद अब्बास राठेर (वय 32) यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत इस्लाम याने जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या निर्देशानुसार त्याने आयईडी बनवण्यासाठी रसायनं, बॅटरीज आणि इतर सामग्री खरेदीसाठी अॅमेझॉनच्या ऑनलाईन शॉपिंग अकाऊंटचा वापर केला होता, अशी माहिती दिली. ही सामग्री खरेदी करुन त्याने जैशच्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवली होती.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या आत्मघाती स्फोटात एक आईडी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवून स्फोट घडवून आणण्यात आला होता. एनआयए कडे याप्रकरणाचा तपास सोपवण्यात आला असून याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे यामध्ये काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेली बापलेकीची जोडी आणि हल्लेखोराच्या सहकाऱ्याचा समावेश आहे.