पुडुचेरीतील (Puducherry) कॉंग्रेस सरकारवर सध्या असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उपराज्यपाल किरण बेदी (Kiran Bedi) यांना पदावरून हटविण्यात आले आहे. मंगळवारी रात्री राष्ट्रपती भवनकडून दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यालयातून जारी केलेल्या निवेदनानुसार नवीन नियुक्ती होईपर्यंत, तेलंगानाच्या राज्यपाल तमिलीसाई सौंदराराजन (Tamilisai Soundararajan) यांना सध्याच्या काळात पुडुचेरीच्या उपराज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे. 29 मे 2016 रोजी किरण बेदी यांना लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्यांना अचानक पदावरून का हटवले याचे कारण स्पष्ट झाले नाही.
पुडुचेरीमधील कॉंग्रेस सरकार आणि किरण बेदी यांच्यामध्ये बराच संघर्ष सुरु होता. 10 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर केले आणि माजी आयपीएस अधिकारी बेदी यांना परत बोलावण्याचे आवाहन केले. त्यांनी दावा केला आहे की किरण बेदी या ‘तुघलक दरबार’ चालवित आहेत. पुडुचेरीतील विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना किरण बेदी यांना पदावरून हटविण्यात आले आहे.
Dr. Kiran Bedi removed as the Lieutenant Governor of Puducherry
Dr. Tamilisai Soundararajan, Governor of Telangana, given additional charge as Lieutenant Governor of Puducherry pic.twitter.com/pSOoIgcCJK
— ANI (@ANI) February 16, 2021
तमिलीसाई सौंदराराजन या नवीन उपराज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्यासाठी ही नवीन जबाबदारी अंमलात येईल आणि पुडुचेरीचे उपराज्यपाल म्हणून नवीन कोणी नियुक्त होईपर्यंत त्या हे पद सांभाळतील. दुसरीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुडुचेरी दौर्याआधी आमदार ए जॉन कुमार यांनी मंगळवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे कुमार यांचा राजीनामा विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षासाठी एक धक्का आहे. (हेही वाचा: 'हम दो..हमारे दो': केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांचा Rahul Gandhi यांना दलित मुलीशी लग्न करण्याचा सल्ला; जाणून घ्या काय म्हणाले)
किरण बेदी यांना पदावरून काढून टाकण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेस पक्ष दीर्घकाळापासून प्रदर्शन करीत होते. याबाबत कॉंग्रेसप्रणीत सेक्युलर डेमोक्रॅटिक अलायन्सनेही बंदचे आयोजन केले होते. नंतर तो मागे घेण्यात आला. किरण बेदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य अधिकाऱ्यांच्यासोबत बैठक घेतली आणि कोरोना लसीकरणाबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यांनी त्यासंदर्भात एक व्हिडिओही ट्विट केला आहे.