Priyanka Gandhi Parliament Speech: वायनाडमधून (Wayanad MP) निवडून आलेल्या काँग्रेस खासदार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. संविधानावरील चर्चेदरम्यान (Constitution Debate), प्रियंका यांनी शुक्रवारी लोकसभा आणि संसदेत आपले पहिले भाषण केले. भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात राज्यघटनेचे महत्त्व आणि आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. त्याच वेळी पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्यावर केली जाणारी भाजप आणि मित्रपक्षांची टीका आणि इतर मुद्द्यावरुन सरकारला जोरदार घेरले. पं. नेहरु यांनी का केले ते माहित आहे. तुम्ही काय केले ते सांगा. कधीतरी वर्तमानकाळावर बोला असे अवाहनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांना दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आवाहन
प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संविधानाचे मुख्य शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करून, भारताच्या लोकशाही चौकटीतील त्यांच्या चिरस्थायी योगदानावर प्रकाश टाकत केली. (हेही वाचा, ‘Modi Adani Bhai Bhai’: 'मोदी अदानी भाई-भाई' काँग्रेसचे संसद परिसरात निदर्शन; काळ्या पिशव्या घेऊन प्रियंका आणि राहुल गांधींचा सहभाग)
भाजप सरकारवर टीका
सत्ताधारी पक्ष संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला. तसेच, संविधान म्हणजे जनतेसाठी सुरक्षा कवच असल्याचेही त्या म्हणाल्या. भाजप सरकारने आपली धोरणे आणि कृतींद्वारे हे कवच कमकुवत करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांनी केला. याच वेळी त्यांनी गौतम अदानी आणि केवळ काहीच कॉर्पोरेट कंपन्यांना सरकारकडून फायदा मिळवून दिला जातो, असे सांगतानाच त्यांनी सरकारवर पक्षपाताचाही आरोप केला. (हेही वाचा, Priyanka Gandhi Vadra takes Oath: प्रियंका गांधी, Ravindra Chavan यांनी घेतली खासदारकीची शपथ; लोकसभेत घुमला मराठी आवाज)
प्रियंका गांधी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्देः
-
- न्याय आणि हक्क: "राज्यघटनेने लोकांना त्यांचा न्यायाचा अधिकार आणि सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याची त्यांची क्षमता ओळखण्याची शक्ती दिली".
- स्वातंत्र्यलढा: "आपला स्वातंत्र्यलढ अद्वितीय होता, कारण तो सत्य आणि अहिंसेवर आधारित होता". आपल्या भाषणादरम्यान प्रियंका गांधी यांनी आपला व्यक्तिगत अनुभव सामायिक (शेअर) केला. त्याम्हणाल्या मी संबळ आणि इतरही काही ठिकाणी जाऊन पीडितांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मला अदनान आणि उझैर या दोन मुलांना भेटण्यास मिळाले. ज्यांचे वडील, एक दर्जी होते, त्यांची पोलिसांनी हत्या केली होती. त्यांच्या वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यघटनेने त्यांच्यात आशा कशी निर्माण केली हे त्यांनी सांगितले.
- आरक्षण: केद्र सरकारने आपल्या विविध धोरणांद्वारे पार्श्व प्रवेश आणि खासगीकरणाच्या धोरणांद्वारे आरक्षण व्यवस्था कमकुवत केल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला.
प्रियंका गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल
#WATCH | In Lok Sabha, Congress MP Priyanka Gandhi Vadra says, "The one, whose name you sometimes hesitate in speaking out, while speaking fluently at other times to use it to save yourself - he set up HAL, BHEL, SAIL, GAIL, ONGC, NTPC, Railways, IIT, IIM, Oil Refineries and… pic.twitter.com/5N0f0BwQBl
— ANI (@ANI) December 13, 2024
लोकसभेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी म्हटले की, लोकसभेत ज्याचे नाव घेताना तुम्ही कधी कधी संकोच करता, तर इतर वेळी अस्खलितपणे बोलता ते स्वतःला वाचवण्यासाठी वापरता - त्यांनी HAL, BHEL, SAIL, GAIL, ONGC, एनटीपीसी, रेल्वे, आयआयटी, आयआयएम, ऑइल रिफायनरीज आणि अनेक पीएसयूमधून त्याचे नाव पुसले जाऊ शकते पण या राष्ट्राच्या स्वातंत्र्यात, या राष्ट्राच्या उभारणीत त्यांची भूमिका या राष्ट्रातून कधीच पुसली जाऊ शकत नाही.
प्रियंका गांधी यांनी आपले संपूर्ण भाषण सामाजिक न्यायावर भर देतकेले. त्यांनी न्याय, समानता आणि घटनात्मक तत्त्वांचे रक्षण करण्याची गरज या संकल्पनांवर विशेष भर देताना वैयक्तिक किस्से अधोरेखित करून आणि सरकारी कृतींवर टीका करून, त्यांनी सामाजिक न्यायाप्रती आपल्या पक्षाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रियंका गांधी यांच्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे. हे प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकीय भूमिकेचे संकेत देते कारण त्या गंभीर राष्ट्रीय मुद्द्यांवर भाजप सरकारला आव्हान देतात, असे राजकीय अभ्यासक सांगतात.