NRI Employee in Five-Star Hotel: एका खाजगी कंपनीच्या सीईओवर त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या अनिवासी भारतीय (NRI) महिलेवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. ही कथित घटना 14 सप्टेंबर 2023 रोजी चाणक्यपुरी जिल्ह्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडली. दिल्ली पलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाने शनिवारी (13 जानेवारी) रात्री दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) अंतर्गत आरोपीविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून कारवाई केली आहे.
ओळखीतून नोकरी
दिल्ली पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन घेतलेल्या पीडिताच्या जबाबामध्ये म्हटले आहे की, पीडित हा आरोपीच्या (सीईओ) कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून सेवेत आहे. आरोपी हा पीडितेच्या काकाच्या ओळखीचा होता. याच ओळखीने पीडितेला या ठिकाणी नोकरी मिळाली होती. (हेही वाचा, Live-In Partner Murder and Massive Hunt: लिव्ह-इन पार्टनरची हत्या, सात राज्यांमध्ये शोध मोहिम राबवत दिल्ली पोलिसांकडून आरोपीला अटक)
महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
दिल्ली पोलीस अधिक माहिती देताना म्हणाले की, प्राप्त तक्रार, महिलेचा जबाब आणि इतर काही माहितीवरुन एफआयआर दाखल करुन आम्ही तपास सुरु केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक झाल्याची माहिती नाही. मात्र, पोलिसांनी चौकशी आणि तपास सुरु केला आहे. सर्व तपासाअंती पोलीस लवकरच आरोपीपर्यंत पोहोचतील अशी माहिती आहे. या घटनेतील सत्य आणि तथ्य तपासानंतर पुढे येईलच. परंतू तोपर्यंत या घटनेने कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षेच्या आव्हानांवर आणि कर्मचार्यांच्या असुरक्षिततेवर प्रकाश टाकला आहे. खास करुन जेव्हा पॉवर डायनॅमिक्स आणि वैयक्तिक कनेक्शन कार्यात येतात. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करुन आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. (हेही वाचा, NewsClick चे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्यासह 2 जणांना अटक, 46 संशयितांची चौकशी; UAPA अंतर्गत करण्यात आली कारवाई)
करमचारी सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नागरिकांनी म्हटले आहे की, हे प्रकरण कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी कामाच्या ठिकाणी उपाययोजना राबविण्याची गंभीर गरज अधोरेखित करते. तसेच, लैंगिक अत्याचार आणि छळाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यापक सामाजिक अत्यावश्यकतेवर भर देते.
तक्रारच नसल्याने आरोपी मोकाट
दरम्यान, कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ ही एक समाजिक समस्या ठरली आहे. राज्य आणि केंद्र सरकारने अनेक कायदे आणि नियम घालून दिले तरीही छळाच्या घटना घडत असतात. एक प्रमुख समस्या अशी की, आर्थिक संपन्नता नसणे आणि कामाची गरज असणे यातून अनेक प्रकरणांची तक्रारच होत नाही. त्यामुळे अशा घटना घडूनही त्याची माहितीच पोलिसांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी ज्यांच्यासोबत असे प्रकार घडल्या तरी पीडितांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अशा घटना घडल्या तर न घाबरता तातडीने पोलिसांशी संपर्क साधा असे अवाहन पोलिस करता.