New Delhi Crime: केवळ पंधराशे रुपयांसाठी तरुणाची भोसकून हत्या
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पश्चिम दिल्ली परीसरातील पंजाबी बाग परिसरात राहणाऱ्या विनोद उर्फ विनू नामक व्यक्तीची शेजाऱ्याने हत्या (Delhi Murder) केली आहे. धक्कादायक असे की, किरकोळ वाद आणि केवळ 1,500 रुपयांसाठी त्याने हे कृत्य केले. ही घटना मादीपूर जेजे क्लस्टरमध्ये असलेल्या पीडित व्यक्तीच्या घरातच 22 डिसेंबर रोजी उघडकीस आली. पीडिताचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी चाकुने भोसकलेल्या स्थितीत आढळून आला. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या प्रकरणात मोहम्मद अब्दुल्ला नावाच्या एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.

शेजाऱ्यांमध्ये जोरदार वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या एक दिवस आधी विनोद आणि अब्दुल्ला यांच्यात 1,500 रुपयांवरुन जोरदार वाद झाला. या वादातून उब्दुल्ला याने विनोंदवर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर या हल्ल्यातून कसाबसा सावरलेल्या विनोद याने अब्दुलचे घर गाठले. मात्र, तो घरी नसल्याचे पाहून विनोद याने जोरदार शिवगाळ केली. त्याच्या कुटुंबीयांनाही विनोदने जोरदार शिवीगाळ केली. अब्दुल घरी आल्यावर त्याला एकूण प्रकाराबद्दल माहिती मिळाली. कुटुंबीयांकडून घडलेला प्रकार ऐकून चिडलेल्या अब्दुलने दुसऱ्याच दिवशी विनोद याचे घर गाठत त्याच्यावर चाकूने पुन्हा हल्ला केला. ज्यामध्ये घाव वर्मी लागल्याने आणि अनेक वेळा भोसकल्याने विनोदचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा, Sexual Exploitation: लैंगिक शोषण केल्याचा बदला; तरुणाची भोसकून हत्या, मृतदेह जाळला)

अटक आणि तपास:

विनोदचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अब्दुल्लाचा शोध सुरू केला आणि 25 डिसेंबर रोजी त्याला स्थानिक परिसरातून अटक करण्यात आली. तपास चालू आहे, अधिकार्‍यांनी वादाच्या दरम्यान घडलेल्या घटना आणि त्यानंतरच्या हत्या प्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी एकत्रितपणे तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, Live-In Partner Murder and Massive Hunt: लिव्ह-इन पार्टनरची हत्या, सात राज्यांमध्ये शोध मोहिम राबवत दिल्ली पोलिसांकडून आरोपीला अटक)

घटनेची पार्श्वभूमी

आपल्या मोठ्या भावासोबत राहणारा विनोद हा शेजाऱ्यासोबतच्या वादाचा बळी ठरला. किरकोळ व्यवहार आणि बाचाबाचीतून झालेल्या वादाचे पर्यावसन मोठ्या भांडणात आणि पुढे हत्येत झाले. ही घटना आर्थिक वाद आणि पूर्ववैमनस्यातून घडली असावी अशी पोलिसांकडील प्राथमिक माहिती आहे. ज्याची पोलिसांनी आगोदच नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.

दरम्यान, इतक्या क्षुल्लख कारणावरुन व्यक्तीची हत्या केली जावी, आरोपीने इतके टोकाचे पाऊल उचलावे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ज्या घरात पीडिताचा मृतदेह आढळून आला त्या घराच्या आजूबाजूच्या नागरिक आणि कुटुंबामध्ये बराच काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात एकास अटक केली आहे.