PM Narendra Modi's New Record: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा विक्रम; 'या' बाबतीत जगातील सर्व नेत्यांना टाकले मागे, घ्या जाणून
PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता डिजिटल जगातही खूप पुढे आहे. ट्विटरपासून इंस्टाग्रामपर्यंत आणि फेसबुकपासून लिंक्डइनपर्यंत जवळजवळ सर्वत्र पंतप्रधान मोदींची खाती आहेत. यूट्यूबवरही (Youtube) पीएम मोदी खूप लोकप्रिय आहेत व याचा अंदाज तुम्ही त्यांच्या सदस्य संख्येवरून लावू शकता. यूट्यूबवर पंतप्रधान मोदींची सदस्या संख्या जगातील इतर कोणत्याही प्रमुख नेत्यापेक्षा जास्त आहे. यूट्यूबवर नरेंद्र मोदी चॅनलचे सब्सक्राइबर 10 दशलक्ष म्हणजेच एक कोटींहून अधिक झाले आहेत. नरेंद्र मोदी चॅनलवर आतापर्यंत 15,477 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

अशाप्रकारे पीएम नरेंद्र मोदी यांच्या नावावर एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. नरेंद्र मोदी हे ट्विटरवर जगभरात सर्वाधिक फॉलो केले जाणारे राजकारणी आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते गेल्या वर्षी निलंबित केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले.

युट्यूब वरील सर्वात जास्त सब्सक्राइबर असलेले जागतिक नेते-

नरेंद्र मोदी (भारत) - 1 कोटी

जैर बोल्सोनारो (ब्राझील) - 36 लाख

आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (मेक्सिको) – 30.7 लाख

जोको विडोडो (इंडोनेशिया) – 28.8 लाख

जो बिडेन (यूएसए) - 7.03 लाख

भारतातील विरोधी पक्ष नेते-

राहुल गांधी- 5.25 लाख

शशी थरूर- 4.39 लाख

असदुद्दीन ओवेसी 3.73 लाख

एमके स्टॅलिन 2.12 लाख

मनीष सिसोदिया 1.37 लाख (हेही वाचा: PM Modi Speaking on Budget 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अर्थसंकल्पाबद्दल भाषण)

पीएम मोदी 2007 मध्ये यूट्यूबवर आले, परंतु त्यांनी 4 वर्षांनंतर 18 मार्च 2011 रोजी पहिला व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडिओ गुजरातच्या 2011-12 च्या अर्थसंकल्पातील आहे. ट्विटरवर पीएम मोदींच्या फॉलोअर्सची संख्या सध्या 7.35 कोटींच्या पुढे गेली आहे. पीएम मोदी 2,430 लोकांना फॉलो करतात. पीएम मोदींनी 2009 मध्ये मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर त्यांचे खाते तयार केले होते. त्या काळात ते गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते.