देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्वातंत्र्य दिन (India Independence Day 2019) आणि रक्षाबंधन (Raksha Bandhan 2019) सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील जनतेसाठी आज दुहेरी आनंदाचा क्षण आहे. आज 15 ऑगस्ट. म्हणजेच देशाचा स्वातंत्र्य दिन. पण, यंदा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला रक्षाबंधन यंदा स्वातंत्र्य दिनी आला आहे. त्यामुळे देशप्रेम आणि बंदू भगिनींचे प्रेम एकत्रच साजरे करता येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या दोन्ही अनमोल दिनांचे औचित्य साधत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत आज (15 ऑगस्ट 2019) आपला 73 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. अशा या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह देशभरात तेव्हाच खऱ्या अर्थाने सुरु होतो, जेव्हा देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन राष्ट्रध्वज (National Flag) फडकवतात. लाल किल्ला (Red Fort) आणि 15 ऑगस्ट यांचे अतूट नाते आहे. गेली 72 वर्षे ही परंपरा कायम आहे. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राजधानी दिल्ली (Delhi) येथील लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवतील. लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधीत करतात. (हेही वाचा, Indian Independence Day 2019: स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात प्रभावी भाषण कसे कराल?)
पंतप्रधान मोदींकडून जनतेला शुभेच्छा
Prime Minister Narendra Modi: Happy #IndependenceDay to all my fellow Indians. Jai Hind! pic.twitter.com/aeF4ka3xvz
— ANI (@ANI) August 15, 2019
दरम्यान,दरम्यान, रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीत एक महत्तवाचा असलेला सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते. या निमित्ताने बहिण भाऊ आणि घरातील लोक एकमेकांना भेटत असतात. घरातील सर्वांसाठी हा मोठा आणि तितकाच आनंदाचा क्षण असतो. बदलत्या काळानुसार आज या सणाचेही रुपडे बदललेले पाहायला मिळते. (हेही वाचा, Raksha Bandhan 2019 Muhurat: रक्षाबंधन साजरं करण्याचा यंदा शुभ मुहूर्त कोणता? 19 वर्षांनी जुळून आलाय हा खास योग)
पंतप्रधान मोदी यांच्यकडून जनतेला रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा
Prime Minister Narendra Modi: Greetings on the auspicious occasion of #RakshaBandhan. pic.twitter.com/K71eO00ffm
— ANI (@ANI) August 15, 2019
दरम्यान, स्वातंत्र्य दिनी रक्षाबंधन येणे हा दुर्मिळ योगायोग मानला जात आहे. या दुर्मिळ योगायोगामुळे देशातील जनतेला देशप्रेम आणि आपले बंधुभगीनींना एकमेकांवरील प्रेमस सिद्ध करण्याची दुहेरी संधी मिळणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, रक्षाबंधनाचा आनंद सारजार करण्यासाठी घराघरांमध्ये उत्साह आहे.