Narendra Modi Holy Dip in Kumbh Mela 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज प्रयागराजला (Prayagraj ) भेट देऊन कुंभ मेळ्याला हजेरी लावली. आज कुंभमेळ्यामध्ये संगम त्रिवेणीवर त्यांनी डुबकी लावली. पाच वेळेस डुबकी लावल्यानंतर गंगेचे दर्शन घेतले. नरेंद्र मोदी यांच्या सोबत प्रयागराजचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील हजर होते. त्यांनी एका तराफ्यातून संगम त्रिवेणीवर गंगेची विधिवत पूजा केली. दुधाचा अभिषेक आणि काही नैवेद्य अर्पण केला. या ठिकणी मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. आयुष्यभर सफाईकर्मचाऱ्यांचे माझ्यावर उपकार राहतील असे नरेंद्र मोदी म्हणाले.
Had the good fortune of taking a holy dip at the #Kumbh. Prayed for the well being of 130 Crore Indians. pic.twitter.com/jTI2QbmWxb
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2019
#WATCH: Prime Minister Narendra Modi washes feet of sanitation workers in Prayagraj pic.twitter.com/otTUJpqynU
— ANI UP (@ANINewsUP) February 24, 2019
नरेंद्र मोदी यापूर्वी जानेवारी महिन्यात अमित शहा यांच्यासोबत प्रयागराजला आले होते. त्यावेळेस त्यांनी औपचारिकरित्या कुंभमेळ्याची सुरुवात केली. ४ मार्चपर्यंत प्रयागराज येथील कुंभमेळा सुरु राहणार आहे. तीन शाही स्नान झाली असून चौथे शाहीस्नान महाशिवरात्रीच्या दिवशी आहे. Kumbh Mela 2019: कुंभमेळ्यात 'या' दिवशी होणार शाही स्नान; जाणून घ्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व
यंदा प्रयागराजच्या कुंभमेळ्यात आत्तापर्यंत 20 कोटीहुन अधिक भाविकांनी भेट देईल असल्याचं सांगण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अमित शहा यांच्यासह योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह या कुंभमेळ्यात डुबकी लावली आहे. अंतिम शाही स्नानाला काँग्रेसच्या प्रियंका गांधी उपस्थिती लावणार असल्याची चर्चा आहे.