पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी साधणार संवाद; Lockdown 5.0 बाबत सविस्तररीत्या बोलण्याची अपेक्षा
PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (31 मे) सकाळी 11 वाजता 'मन की बात' (Maan Ki Baat) या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसची वाढती व्याप्ती नियंत्रित करण्यासाठी काल लॉकडाऊन 5.0 (Lockdown 5.0) ची घोषणा झाली. हा लॉकडाऊन देशभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये (Containment Zone) असणार असून यासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. तसंच तीन टप्प्यात देशभरातील सेवा सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. यासंदर्भात आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सविस्तर बोलतील, अशी अपेक्षा आहे.

'मन की बात' हा रेडिओ प्रोग्रॅम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर वर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लेटेस्ट घडामोडी, समस्या यासंदर्भात जनतेशी संवाद साधतात. मागील कार्यक्रमातही मोदींनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जागरुक राहण्याचा सल्ला दिला होता. तसंच काळजी घ्या, योग्य खबरदारी बाळगा असे देखील सूचित केले होते. कोरोना विरुद्ध भारत देत असलेला लढा अत्यंत प्रेरणादायी असून या लढाईत भारतवासियांनी दर्शवलेल्या सहभागाबद्दल त्यांनी देशवासियांचे अभिनंदन केले होते. अशा प्रकारे कोविड-19 संकटात जनतेचे मनोबल वाढवण्याचे काम मोदींनी वारंवार केले आहे. (Unlock 1 Guidelines: कटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊनमध्ये 30 जूनपर्यंत वाढ; केंद्र सरकारकडून कंन्टेंटमेंट झोन वगळता कोणती कामे सुरु होणार यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सुचना जारी)

ANI Tweet:

यापूर्वी मोदी 'मन की बात' मधून लॉकडाऊन 5 ची घोषणा करणार अशी चर्चा होती. दरम्यान गृहमंत्रालयाने याबद्दल स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊन 5 याबाबत मोदी सविस्तररीत्या काय बोलतात, याकडे देशवासियांचे लक्ष लागले होते.