Mallikarjun Kharge (Photo Credits: ANI)

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची संभावना विषारी साप अशी केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कलबूर्गी (Kalaburagi) येथे प्रचार सभेदरम्यान बोलत असताना मल्लिकार्जून खडगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Mallikarjun Kharge On Narendra Modi) हे विषारी सापासारखे आहेत. पण, तुम्हाला क्षणभर प्रश्न पडेल की ते विष आहे किंवा नाही. पण ते प्राशन करताच आपला मृत्यू होतो.

मल्लिकार्जून खडगे यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले. ठाकूर म्हणाले की, मल्लिकार्जून खडगे यांनी केलेले वक्तव्य काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापेक्षाही वाईट आहे. काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाचे अध्यक्ष केले पण त्यांना कोणीही मानत नाही, म्हणून त्यांनी सोनिया गांधींनी दिलेल्या विधानापेक्षा वाईट विधान करण्याचा विचार केला, असल्याचेही ठाकुर म्हणाले. (हेही वाचा, प्रियंका गांधी यांनी 'सुसाइड नोट' विनोदावरून पंतप्रधान मोदींवर केली टीका, पहा व्हिडिओ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील सुमारे 50 लाक भाजप कार्यकर्त्यांना अभासी माध्यमातून संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती की, काँग्रेस म्हणजे खोटी हमी, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची हमी. पंतप्रधानांच्या टीकेला काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही हल्ला चढवला. जयराम रमेश म्हणाले की, कर्नाटकातील जनता 10 मे रोजी भाजपचे 40% कमिशन देऊन सरकार संपवण्याची हमी देईल. जी हमी राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात केली तशी काँग्रेसची हमी राज्यातही लागू केली जाईल.