अच्छे दिन येण्याची वाट पाहत असलेल्या सामान्य लोकांना झटका बसला आहे. सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. अनुदानित असणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 2.08 रुपये आणि विनाअनुदानितसाठी 42.50 रुपयांनी महाग झाले आहे. गेल्या तीन महिन्यात सिलिंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आता पुन्हा एकदा सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याबाबत माहिती दिली आहे. वाढत्या इंधन वाढीमुळे गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने असे सांगितले की, वाढत्या इंधन दर वाढीमुळे गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या गेल्याचे म्हटले आहे. तर दिल्लीत 14.2 किलोग्रॅम अनुदानित सिलेंडरसाठी 495.61 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच विनाअनुदानित सिलेंडरसाठी 701.50 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.(हेही वाचा-लवकरच भारतात उपलब्ध होणार ब्लास्ट प्रुफ सिलिंडर; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ठ्ये)
तर मुंबईतील ग्राहकांना अनुदानित गॅस सिलिंडरसाठी 493.32 रुपये आणि विनाअनुदानित सिलिंडरसाठी 673.50 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचसोबत कोलकाता येथे 498.75 रुपये अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरसाठी 727.50 रुपये ग्राहकांना द्यावे लागणार आहेत. घरगुती गॅस उपभोक्ताला एका आर्थिक वर्षात अनुदानित 12 सिलेंडर मिळतात.