President Election Results 2022: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना 540 तर, प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना 208 मते, 15 मते अवैध घोषीत
Draupadi Murmu-Yashwant Sinha (PC - Twitter)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यानंतर या पदाची सूत्रे कोणाकडे जाणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी (President Election Results 2022) मैदानात असलेल्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. आता केवळ त्यांच्या विजयाची औपचारीक घोषणा बाकी आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थातच एनडीएकडून द्रौपदी मुर्मू मैदनात आहेत. तर संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे यूपीएकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) मैदानात आहेत. एनडीएकडे असलेले खासदार आमदारांचे बळ पाहता द्रौपदी मुर्मू यांचा विजय होईल हे जवळपास नक्की मानले जात होते. घडतानाही तसेच दिसत आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एकूण 748 मते मोजली गेली. त्यापैकी 15 मते बाद झाली. उर्वरीत मतांपैकी द्रौपदी मुर्मू यांना 540 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या यशवंत सिन्हा यांना 204 मते मिळाली आहेत. मतांची संख्या आण एकूण कल पाहता देशाच्या इतिहासात प्रथमच आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत राष्ट्रपती पदाचा अपवाद वगळता इतर कोणत्याही महिलेला या पदावर बसण्याचा मान मिळाला नाही. तो आता द्रौपदी मुर्मू यांच्या रुपात पूर्ण होतो आहे. (हेही वाचा, Droupadi Murmu Vs Yashwant Sinha: राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज; 11 वाजता सुरू होणार मतमोजणी)

ट्विट

राष्ट्रपती पदासाठी 18 जुलै रोजी मतदान पार पडले. या मतांची मतमोजणी आज सकळी 11 वाजलेपासून संसद भवनात सुरु झाली आहे. निवडणुक अधिकाऱ्यांच्या खोली क्रमांक 63 मध्ये ही मतगणना सुरु आहे. निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राज्यसभा सचिव जनरल पीसी मोदी मतमोजणीवर लक्ष ठेऊन आहेत. सायंकाळपर्यंत अंतिम निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी समाप्त होतो आहे. 25 जुलै रोजी नवे राष्ट्रपती शपथ घेतील.