Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
43 seconds ago

Prem Singh Tamang Oath Ceremony: SKM प्रमुख PS तमांग आज सलग दुसऱ्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) प्रमुख आणि मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शानदार विजय नोंदवला. विधानसभेच्या 32 जागा जिंकल्यानंतर ते आज राज्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 12 कॅबिनेट मंत्रीही सरकार चालवण्याची शपथ घेणार आहेत. राजभवनात दुपारी ४ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. जे सुमारे दीड तास चालेल. त्यासाठी राजभवनात जोरदार तयारी सुरू आहे.

बातम्या Shreya Varke | Jun 10, 2024 10:29 AM IST
A+
A-
Prem Singh Tamang Oath Ceremony

Prem Singh Tamang Oath Ceremony: सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) प्रमुख आणि मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शानदार विजय नोंदवला. विधानसभेच्या 32 जागा जिंकल्यानंतर ते आज राज्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 12 कॅबिनेट मंत्रीही सरकार चालवण्याची शपथ घेणार आहेत. राजभवनात दुपारी ४ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. जे सुमारे दीड तास चालेल. त्यासाठी राजभवनात जोरदार तयारी सुरू आहे. विरोधी एसडीएफचे प्रमुख आणि राज्याचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवनकुमार चामलिंग यांना सिक्कीम विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या दोन्ही जागांवर पवनकुमार चामलिंग यांचा पराभव झाला आहे. नामचेबुंग विधानसभा जागेवर SKM चे राजू बस्नेत यांनी त्यांचा 2,256 मतांनी पराभव केला. बसनेट यांना ७,१९५ तर चामलिंग यांना ४,९३९ मते मिळाली. पोकलोक-कामरांग जागेवर SKM चे भोजराज राय यांनी त्यांचा 3,063 मतांनी पराभव केला. राय यांना 8,037 आणि चामलिंग यांना 4,974 मते मिळाली.

यापूर्वी ते ९ जून रोजी होणार होता शपथ विधी सोहळा:

मात्र, याआधी पीएस तमाग हे ९ जून रोजी शपथ घेणार होते. मात्र शपथविधी सोहळा दिवसभरासाठी पुढे ढकलण्यात आला. कारण 9 जून रोजी त्यांना दिल्लीत पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावायची होती.

सिक्कीममध्ये 19 एप्रिल रोजी विधानसभेच्या 32 जागांसाठी मतदान झाले होते. 2 जून रोजी मतमोजणी झाली. निवडणुकीच्या निकालात प्रेमसिंग तमांग यांना मोठे यश मिळाले. राज्यातील एक वगळता सर्व जागा त्यांनी जिंकल्या.


Show Full Article Share Now