ओडिशात कापलेले 10 मानवी हात सापडले, नागरिकांमध्ये घबराट
फोटो सौजन्य- फाइल इमेज

ओडिशामध्ये जाजपूर येथे रविवारी 10 कापलेले मानवी हात सापडल्याची धक्कादायक घडना घडली आहे. यामुळे जाजपूर येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

2006 रोजी कलिंग नगर येथे स्टिल कारखाना उभारण्यात येणार होता. मात्र त्यावेळी आदिवासी लोकांनी या प्रकल्पाविरुद्ध आंदोलन केले होते. त्यामुळे आंदोलनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी 13 पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले होते. मात्र शवविच्छेदन करण्यात आलेल्यांपैकी पाच मृत देहांची ओळख पडली नव्हती. तसेच आदिवासींना त्यांच्या मृत देहाचे हात परत करण्यात आले होते. परंतु त्यांनी ते घेण्यास नकार दिल्याने एका मेडिकल बॉक्समध्ये त्या हातांचे जतन करण्यात आले होते.

मात्र शनिवारी काहींनी तेथे असलेल्या क्लबची खिडकी तोडून तो मेडिक बॉक्स घेऊन पळ काढला. त्यानंतर चोरी केलेला हा बॉक्स त्यांनी जाजपूर येथे नेऊन फेकला. त्यामुळे ओडिशातील लोकांमध्ये घबराट परसली आहे.