राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांची भेट सोमवारी (13 जानेवारी 2020) घेतली. या भेटीत पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (Punjab and Maharashtra Co-operative Bank) घोटाळाप्रकरणानंतर बँकेचे पुनरुज्जीवन आणि ग्राहकांना दिलासा या विषयावर चर्चा झाल्याचे समजते. दोन्ही नेत्यांमध्ये पीएमसी बँक (PMC Bank) प्रकरणावर रचनात्मक चर्चा झाली.
भारतीय रझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर अनेक निर्बंध घातले आहेत. अनेक कोटींचा घाटाळा समोर आल्यानंतर आरबीआयने पीएमसवर ही कारवाई केली आहे. त्यामुळे या बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा आल्या आहेत. सुरुवातीला या बँकेतून ग्राहकास केवळ 50,000 इतकेच पसै काढण्यास मान्यता होती. मात्र, पुढे त्यात वाढ करुत ग्राहकाला एकाच वेळी 50,000 रुपये इतकी रक्कम काढता येईल अशी तरतूद करण्यात आली.
एएनआय ट्विट
Delhi: NCP Chief Sharad Pawar met MoS Finance Anurag Thakur over issue of revival of Punjab and Maharashtra Co-operative(PMC) Bank pic.twitter.com/SnUsq78Vqr
— ANI (@ANI) January 13, 2020
दरम्यान, शरद पवार यांनी कलेलल्या ट्विटममध्ये म्हटले आहे की, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांच्यासोबतच्या बैठकीत पीएमसी बँकेच्या पुनरुज्जीवनाबद्दल चर्चा झाली. या विषयावर आम्ही दोघांनीही विचारांचे आदानप्रदान केले. (हेही वाचा, SBI ची नवी योजना! बिल्डरने वेळेवर घराचा ताबा न दिल्यास बँक परत करणार Home Loan चे पैसे)
शरद पवार ट्विट
Had a meeting with the Union Minister of State for Finance, Shri Anurag Singh Thakur (@ianuragthakur) in New Delhi to raise the issue of revival of PMC Bank. We had a constructive exchange of views on the topic. pic.twitter.com/5WNDV1CPEF
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 13, 2020
पीएमसी बँक घोटाळा गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर 2019 मध्ये उघडकीस आला होता. यात बँक कथीत रुपात दिवळखोर झाल्याचे तसेच, हाउसिंग डेवलपमेंट एंड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआईएल) ली दिलेल्या 6,7000 कोटी इतक्या भल्याभक्कम कर्जाची रक्कम लपविण्यात आल्याचे पुढे आले होते.
दरम्यान, पीएमसी बँकेतील घोटाळा पुढे आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अस्वेशन शाखा आणि प्रवर्तन निर्देशनालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. EOW ने गेल्याच महिन्यात PMC बँकेच्या पाच व्यक्तिंविरोधात तब्बल 32,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.