लालकृष्ण अडवाणी यांच्या ब्लॉगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट
PM Narendra Modi & L.K. Adwani (Photo Credits: File Photo)

लोकसभा निवडणूकीला सुरुवात होण्यापूर्वी भाजपाचे (BJP) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (L.K. Advani) यांनी एक ब्लॉग लिहिला. गुजरात येथील गांधीनगर येथून निवडणूकीचे तिकीट न मिळाल्याची वेदना या ब्लॉगमधून मांडण्याचा अडवाणी यांनी प्रयत्न केला. हा ब्लॉग म्हणजे भाजपा नेत्यांची कानउघडणीच होती. अडवाणी यांच्या ब्लॉगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. ('आधी देश, मग पक्ष आणि मी', गांधीनगर येथून पत्ता कट झाल्यानंतर प्रथमच लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया)

पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, "अडवाणी यांनी भाजप पक्षाचा सार अगदी अचूक शब्दात सांगितला आहे. प्रथम देश, मग पक्ष आणि मग स्वतः हा मार्गदर्शन मंत्र आहे."

ट्विटमध्ये पुढे त्यांनी लिहिले की, "भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे आणि अडवाणी यांच्यासारख्या महान नेत्यांनी या मंत्राला अधिक शक्तीशाली बनवले आहे."

नरेंद्र मोदी यांचे ट्विट:

 

काल अडवाणी यांनी ब्लॉग लिहित आपली विचारधारा स्पष्ट केली. भाजपाविरोधी असणे म्हणजे देशाविरोधी असणे, असे नाही. भाजपाने प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक, व्यक्तिगत आणि राजकीय स्तरावर आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. इतकंच नाही तर गांधीनगर मतदारांनी सहावेळा निवडून दिल्याबद्दल त्यांनी ब्लॉगमधून मतदारांचेही आभार मानले. विशेष म्हणजे 2015 नंतर पहिल्यांदाच अडवाणी आपल्या ब्लॉगद्वारे व्यक्त झाले.