New Year 2021 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली 'अभी तो सूरज उगा है' ही आशादायी कविता (Watch Video)
File image of PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

नववर्ष 2021 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिंदी (Hindi) भाषेत एक कविता लिहिली आहे. MyGovIndia या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पंतप्रधान मोदींची कविता शेअर करण्यात आली आहे. 'अभी तो सूरज उगा है', (Abhi Toh Suraj Uga Hai) असे या कवितेचे बोल आहेत. या कवितेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यात मोदी स्वत: कविता ऐकवत आहेत. (PM Modi on Coronavirus Vaccine: कोविड-19 वरील लस सर्व भारतीयांपर्यंत पोहचवण्याची तयारी अंतिम टप्प्यात- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

MyGovIndia ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "नव्या वर्षातील पहिल्या दिवसाची सुरुवात प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभी तो सूरज उगा है या कवितेने करुया." या व्हिडिओत आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, शेतकरी, सैनिक आणि पंतप्रधान मोदी पाहायला मिळतील. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी अलिकडेच कोविड-19 लसीचा घेतलेला आढावा त्याचबरोबर शीख साईन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीच्या शीख मंदिर गुरुद्वारा रकाबगंज यांना दिलेली भेट पाहायला मिळेल.

पहा व्हिडिओ:

आज सकाळी पंतप्रधान मोदी यांनी नववर्षानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यात शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले की, "सर्वांना 2021 च्या शुभेच्छा. हे वर्ष तुमच्या आयुष्यात चांगलं आरोग्य, आनंद आणि समुद्धी घेऊन येवो. आशेचा आणि आरोग्याच्या शक्तीचा विजय होवो."

दरम्यान, देशात पसरलेले कोरोनाचे संकटावर मात करण्यासाठी लसीचे प्रभावी शस्त्र हाती लागले आहे. उद्यापासून देशभरात लसीच्या ड्राय रनला सुरुवात होणार आहे. अजून लांबचा पल्ला गाठायचा असला तरी नव्या वर्षात कोविड-19 चं संकट संपणार, अशी आशा अनेकांच्या मनात जागृत झाली आहे.