चैत्र शुद्ध नवमी हा रामवनमीचा सण. प्रामुख्याने हिंदू बांधवांसाठी रामनवमी या सणाला विशेष महत्त्व असतं. देशभरामध्ये आज राम जन्मोत्सवाचा सोहळा साजरा केला जाणार आहे. राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. त्या निमित्ताने भारतामध्ये चैत्र शुद्ध नवमीला मोठा उत्साह साजरा केला जातो. या मंगलमय दिवसाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन केली आहे. सध्या भारतामध्ये कोरोना व्हायरसचं संकट असल्याने नागरिकांना लॉकडाऊनमध्ये घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक रामभक्तांना आज घरामध्ये राहूनच श्री राम जन्माचा सोहळा साजरा करावा लागाणार आहे. Ram Navami 2020 Date: राम नवमी यंदा 2 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व.
राम नवमी निमित्त अनेक श्रीराम भक्त एक दिवस व्रत आणि उपवास करून राम नामाचा जप करतात. यामुळे मनातील विनाशी विचार दूर होतात आणि सकारात्मकता वाढते अशी काहींची धारणा आहे. Happy Ram Navami 2020 Images: राम नवमी निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या श्रीराम भक्तांना शुभेच्छा!
नरेंद्र मोदी यांचे ट्वीट
रामनवमी के पावन अवसर पर समस्त देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। जय श्रीराम!
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चला कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करताना नागरिकांना सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमामध्ये एकत्र येणं टाळावं असं आवाहननागरिकांना केले आहे. यंदा राम नवमी 2 एप्रिलला साजरी केली जात आहे. मात्र हा सोहळा घरच्याघरी साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भारतामध्ये कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. सध्या देशात 1800 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 48 लोकांनी आपला जीव गमावला आहे.