Happy Ram Navami 2020 Images: राम नवमी निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या श्रीराम भक्तांना शुभेच्छा!
Ram Navami 2020 | File Image

Ram Navami 2020 Marathi Wishes and Messages: राम नवमी (Ram Navami) हा चैत्र शुद्ध नवमीचा दिवस. यंदा 2 एप्रिलला जगभरात श्रीरामभक्त राम जन्मोत्सव (Ram Janmotsav) साजरा केला जाणार आहे. दरम्यान दुपारी 12 च्या सुमारास श्रीरामजन्माच्या सोहळ्यानिमित्त घरोघरी पाळणा गाऊन श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. राजा दशरथ आणि राणि कौसल्या यांचा पोटी मध्यान्हसमयी श्रीरामचंद्रांचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे. त्यामुळे दरवर्षी चैत्र शुद्ध नवमीला राम जन्म साजरा केला जातो. मग आजच्या या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना राम जन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करा. सदाचारी, प्रेमळ, पितृभक्त, पराक्रमी आणि पुरूषोत्तम अशी प्रभू रामचंद्रांची ख्याती आहे. भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतातील अयोद्धा येथे रामजन्माचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. तर देशभरात राम जन्माच्या उत्सवामध्ये राम चरित्राच्या कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मग आज मंदिरांमध्ये जाणं शक्य नसल्याने सोशल मीडियावर खास मराठमोळी वॉलपेपर्स, ग्रीटींग्स, HD Images यांच्या माध्यमातून राम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा द्या.

राम नवमी निमित्त अनेक श्रीराम भक्त एक दिवस व्रत आणि उपवास करून राम नामाचा जप करतात. यामुळे मनातील विनाशी विचार दूर होतात आणि सकारात्मकता वाढते अशी काहींची धारणा आहे. Ram Navami 2020 Date: राम नवमी यंदा 2 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व

राम नवमीच्या शुभेच्छा

Ram Navami 2020 | File Image
Ram Navami 2020 | File Image
Ram Navami 2020 | File Image
Ram Navami 2020 | File Image
Ram Navami 2020 | File Image

Ram Navami 2020: राम नवमी विशेष, जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व: Watch Video

 

यंदा रामनवमीच्या उत्सवावर कोरोना व्हायरसचं सावट आहे. त्यामुळे देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जाणार नाही. मात्र घरगुती स्वरूपात दुपारी श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने प्रसाद म्हणून सुंठ, ओवा, साखर यांचा एकत्र सुंठवडा बनवला जातो आणि त्याचं वाटप केलं जातं.