Kisan Rail Sangola to Shalimar: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला (Sangola) ते पश्चिम बंगाल राज्यातील शालीमार (Shalimar) पर्यंत धावणाऱ्या देशभरातील 100 किसान रेल्वे (Kisan Rail) गाड्यांना हिरवा कंदील दाखवणार आहेत. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे येत्या 28 डिसेंबर 2020 या दिवशी दुपारी 4.30 वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमास देशाचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल हे देखील उपस्थित असतील.
मल्टी कमोडीटी अशा या ट्रेनमध्ये फुलकोबी, ढोबळी मिर्ची (कॅप्सिकम), कोबी, ड्रमस्टिक, मिरची, कांदा, तसेच द्राक्षे, संत्री, डाळिंब, केळी, कस्टर्ड सफरचंद इत्यादी भाज्या तसेच नाशवंत शेतीमाल वाहतूक करण्यासही परवनागी असेल. किसान ट्रेनमधून शेतीमालाची वाहतूक करताना त्या वस्तू, त्यांचे आकारमान यावर कोणतेही बंधन असणार नाही. या गाड्या आवश्यक त्या सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच, या गाड्यांमधून शेतीमाल वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारने 50% अनुदानही दिले आहे. (हेही वाचा, Kisan Special Parcel Train: भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी Indian Railways करणार मदत; आता फळे आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीवर मिळणार 50 टक्के सूट)
देशातील पहिली किसान रेल्वे देवळाली ते धानपूर (Devlali to Danapur) या मार्गावर 7 ऑगस्ट 2020 या दिवशी धावील होती. या उपक्रमास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही रेल्वे या रेल्वेमार्गावर आठवड्यातून तीन वेळा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.
PM Narendra Modi will flag off 100th Kisan Rail from Sangola in Maharashtra to Shalimar in West Bengal on December 28 via video conferencing. Union Ministers Narendra Singh Tomar and Piyush Goyal will also be present on the occasion.
(File photo) pic.twitter.com/QrXZeZVPQJ
— ANI (@ANI) December 26, 2020
देशभरातील कृषी मालाची वाहतूक करण्याचा आणि ही वाहतूक सोपी करण्याचा सरकारचा विचार आहे. तसेच, नाशवंत शेतमाल कमीत कमी वेळेत बाराजपेठेपर्यंत घेऊन जाण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे केंद्र सरकारचे म्हणने आहे.