हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) सारख्या उंच टेकड्यांवर वसलेल्या रोहतांग भागात गेल्या 10 वर्षांपासून बोगद्याचे काम सुरु होते. हा बोगदा अखेर पूर्ण झाला असून आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचे आज अनावरण होणार आहे. 'अटल बोगदा' (Atal Tunnel) असे या बोगद्याला नाव देण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चंडिगढ़मध्ये (Chandigarh) दाखल झाले असून काही वेळातच ते रोहतांग येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील. हिमाचल प्रदेशला लेह-लडाखशी जोडणारा हा महत्वपूर्ण बोगदा असल्यामुळे यामुळे पर्यटन आणि दळणवळणाला वाव मिळेल.
10 हजार फूट खोल 9 किमी लांब असलेला हा बोगदा जगातील सर्वात लांब बोगदा असल्याचे सांगण्यात येत आहे. या बोगद्याचे काम पूर्ण करण्यासाठी जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागला. यामुळे मनाली ते किलाँग या दरम्यानचा जवळपास 46 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. सध्या मनाली ते किलाँग हा जवळपास 115 किलोमीटरचा प्रवास आहे.
Himachal Pradesh: Visuals from Sissu in Lahaul valley where PM Narendra Modi will address a public gathering today after inaugurating Atal Tunnel which is the longest highway tunnel in the world.
The tunnel connects Manali to Lahaul-Spiti valley throughout the year. pic.twitter.com/9hyFrFy161
— ANI (@ANI) October 3, 2020
यासोबतच लेह-लडाख सीमेवर तणावाचे वातावरण असल्यामुळे हा चीनशी सुरु असलेल्या संघर्षादरम्यान भारतीय सैन्याला हा अटल बोगदा फार महत्वाचा आणि उपयोगी ठरणार आहे.