Ayodhya Ram Mandir: अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या प्रभू रामचंद्र मुर्ती प्रतिष्ठापणा (Prana Pratishtha) सोहळ्यापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 11 दिवसांचा उपवास (PM Narendra Modi to Observe Fast) करणार आहेत. पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, हा उपवास म्हणजे अयोध्येतील "ऐतिहासिक" आणि "शुभ" प्रसंगाचा भाग आहे. अतिशय ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होण्याची संधी मिळत असल्याने मी भाग्यवान असल्याचेही पंतप्रदानांनी एका ऑडिओ संदेशात म्हटले आहे. वाचकांच्या माहितीसाठी असे की, पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच रामलल्लांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे.
'परमेश्वराने मला एक माध्यम बनवले'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, अयोध्येतील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला फक्त 11 दिवस उरले आहेत. मी भाग्यवान आहे की मी देखील या शुभ सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. अभिषेक करताना सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परमेश्वराने मला एक माध्यम बनवले आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांचा विशेष उपवास सुरू करत आहे. मी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेतो. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. (हेही वाचा, Ram Bhajan Shared By PM Modi: PM नरेंद्र मोदी यांनी शेअर केला हरिहरन यांनी गायलेला 'सबने तुम्हें पुकारा श्री राम जी' गाण्याचा व्हिडिओ)
'व्यग्र कार्यक्रमातही ते उपवास सुरु'
अयोध्येमध्ये राम मंदिर गर्भगृहात रामलल्लाच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. हा भव्य सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. जो पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले असून विविध विभागांवर जबाबदाऱ्याही सोपविण्यात आल्या आहेत. दरम्यान, पतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दैनंदिन कार्क्रमही अतिशय व्यग्र असतो. तरीसुद्धा व्यग्र कार्यक्रमातही ते उपवास सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Will Hang Self In Chowk If Modi Doesn't Become PM:आमदार संतोष बांगर यांच मोठं वक्तव्य, नरेंद्र मोदी पंतप्रधान न झाल्यास घेणार फाशी!)
अनेक पिढ्यांचे स्वप्न साकार
पंतप्रधानांनी म्हटले आहे की, "मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच या भावनेतून जात आहे. मी एका वेगळ्या प्रकारची भक्ती अनुभवत आहे. माझ्यासाठी हा भावनिक प्रवास (भाव यात्रा) हा अनुभवाचा क्षण आहे, अभिव्यक्तीचा नाही. मी त्याची खोली, व्यापकता आणि तीव्रता शब्दात व्यक्त करू शकत नाही. अनेक पिढ्या ज्या स्वप्नासह जगल्या, ते पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे. आपण माझी अवस्था समजू शकता. (हेही वाचा, Shri Ram Bhajan Shared By PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' हँडलवर शेअर केले Osman Mir यांच्या आवाजातील 'राम पधारे' भजन)
दरम्यान, पंतप्रधानांनी पुढे म्हटले आहे की, हे माझे भाग्य आहे की मी नाशिक धाम-पंचवटीपासून माझ्या 11 दिवसांच्या अनुष्ठानाची सुरुवात करत आहे. पंचवटी ही पवित्र भूमी आहे जिथे भगवान श्रीरामांनी बराच वेळ घालवला. आपल्या धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे, देवाच्या यज्ञ आणि उपासनेसाठी आपल्याला स्वतःमध्ये दैवी चैतन्य जागृत करावे लागेल. यासाठी धर्मग्रंथात उपवास आणि कठोर नियम सांगितले आहेत, ज्याचे पालन करण्यापूर्वी अभिषेक करावा लागतो. मला काही तपस्वी आणि अध्यात्मिक जीवनातील महापुरुषांकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांनी सुचविलेल्या यम-नियमांच्या अनुषंगाने मी आजपासून 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत आहे.