File image of PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

भारतावर घोंगावणारे 'अम्फान' चक्रीवादळाचे (Cyclone Amphan) सावट लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज संध्याकाळी 4 वाजता तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत अम्फान चक्रीवादळावरील उपाययोजना आणि खबरदारी घेता येईल यासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती प्रबंधन प्राधिकरण यांची संध्याकाळी 4 वाजता बैठक होईल. काही तासांतच पश्चिम बंगालमध्ये धडकणा-या अम्पान चक्रीवादळाविषयी खबरदारीचे उपायांसंबधी MHA आणि NDMA बैठक घेतील असे अमित शाह यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

गृहमंत्रालयाने सांगितले आहे की, हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत महाभयाण रुप धारण करणार आहे आणि बुधवारपर्यंत 185 किमी ताशी वेगाने वादळी वारे पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशाच्या किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. यामुळे आज संध्याकाळी अम्फान चक्रीवादळ रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. Cyclone Amphan: भारतात येत्या 12 तासांत 'अम्फान' धडकण्याची शक्यता, ओडिशामधील काही जिल्ह्यांना बसणार चक्रीवादळाचा फटका

भारतीय हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे हे वारे उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीजवळ उत्तर पूर्व दिशेकडे वळतील. 20 मे ला दुपारी किंवा संध्याकाळी पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश मध्ये रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.

या अम्फान चक्रीवादळामुळे निर्माण होणा-या आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व उपाययोजना सुरु असून या भागातील सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत अग्निशमन, NDRF, स्थानिक पोलीस सर्वांना सूचना दिल्या आहेत. तसेच येथील नागरिकांना देखील योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितली आहे. पुरेसा अन्नसाठा, पाण्याची सोय करण्यात आली आहे. थोडक्यात बचावकार्याची पूर्वतयारी देखील सुरु आहे.