National Doctor’s Day 2020 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 संकटात लढणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडिओ शेअर करत केला सलाम! (Watch Video)
Prime Minister Narendra Modi (Photo Credits: ANI)

आज 1 जुलै म्हणजे नॅशनल डॉक्टर्स डे (National Doctor’s Day). डॉ बिधान चंद्र रॉय (Dr. B.C. Roy) यांची 1 जुलै रोजी जयंती आणि पुण्यतिथी असते. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ आणि त्यांना श्रद्दांजली म्हणून 1 जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. सध्याच्या कोरोना व्हायरस संकटात सर्व डॉक्टर्स देवदूत बनले आहेत. या कठीण काळात सर्व डॉक्टर्सने स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता रुग्णसेवा केली आहे. अहोरात्र मेहनत घेतली आहे. देवासमान डॉक्टरांना प्रती कृतज्ञता वेळोवेळी व्यक्त केली जाते. देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे. दरम्यान आज नॅशनल डॉक्टर्स डे निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील खास व्हिडिओ शेअर करत डॉक्टरांना सलाम केला आहे. (National Doctor’s Day 2020: डॉ. संजय ओक ते मुफ्फज़ल लकड़ावाला महाराष्ट्राच्या कोविड19 विरूद्ध लढ्यात हे डॉक्टर बजावत आहेत महत्त्वाची भूमिका!)

या व्हिडिओत पंतप्रधान मोदी म्हणतात, आई आपल्याला जन्म देते तर अनेकदा डॉक्टर आपल्याला पूर्नजन्म देतात. सध्याच्या कोविड-19 च्या संकटात सफेद कपड्यात दिसणारे डॉक्टर आणि नर्स ईश्वराचे रुप आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे लोक आपला जीव वाचवत आहेत. त्यामुळे त्यांचे ऋण आपण कधीच फेडू नाही शकत. त्यामुळे देशासाठी झटणाऱ्यांचा सार्वजनिक सन्मान प्रत्येक क्षणी व्हायला हवा.

PM Narendra Modi Tweet:

दरम्यान भारतात कोरोना व्हायरसचे संकट दाट आहे. दिवसागणित कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान मागील 24 तासांत देशात 18,653 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 507 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 5,85,493 वर पोहचली आहे. त्यापैकी 2,20,114 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 3,47,979 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान आतापर्यंत देशात 17,400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे